आयपीएलच्या १३व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्सने उद्घाटनच्या सामन्यात ५ विकेट्सने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. या सामन्यानंतर आज (२० सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात आयपीएलचा दुसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे खेळण्यात आला.
या सामन्यात प्रथम फलंदाजीस उतरलेल्या दिल्ली संघाविरुद्ध पंजाब संघाने चांगली गोलंदाजी केली. दिल्लीच्या ३ फलंदाजांना पंजाबच्या गोलंदाजांंनी अवघ्या १३ धावांमध्येच पव्हेलियनचा रस्ता दाखविला. पुढे फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने दमदार फलंदाजी प्रदर्शन करत संघाचा डाव सावरला.
परंतु १४व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर युवा गोलंदाज रवि बिश्नोईने पंतला त्रिफळाचीत केले, तर त्यापुढील १५व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मोहम्मद शमीने क्रिस जॉर्डनच्या हातून अय्यरला झेलबाद केले. त्यामुळे डाव पंजाबच्या बाजूने वळताना दिसत होता. पण शेवटच्या काही षटकात पंबाजच्या गोलंदाजांची गोलंदाजी बिघडत गेली.
विशेष म्हणजे डावाचा कायापालट करु शकणाऱ्या महत्त्वाच्या २०व्या षटकात अतिशय वाईट गोलंदाजी प्रदर्शन दिसून आले. पंजाबचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने शेवटच्या षटकात १ वाइड आणि १ नो बॉल टाकला. सोबतच दिल्लीचा फलंदाज मार्कस स्टोयनिसने त्याच्या गोलंदाजीवर २ षटकार आणि ३ चौकार ठोकले. त्यामुळे या षटकात त्याने तब्बल ३० धावा निघाल्या.
या अतिशय खराब गोलंदाजी प्रदर्शनामुळे जॉर्डनने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वाधिक धावा देणारा अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापुर्वी बऱ्याच गोलंदाजांनी हा नकोसा विक्रम नोंदवला आहे. पण याबाबतीत ते सर्व गोलंदाज जॉर्डनच्या मागे आहेत.
अशोक दिंडाने २०१७ साली २०व्या षटकात गोलंदाजी करताना २९ धावा दिल्या होत्या. तर शिवम मावीने २०१८ आणि ड्वेन ब्रावोने २०१९ साली हा नकोसा विक्रम केला होता.
आयपीएलमध्ये २०व्या षटकात सर्वात खराब गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज
ख्रिस जॉर्डन – ३० धावा, विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (आज)
ड्वेन ब्रावो – २९ धावा, विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (२०१९)
शिवम मावी – २९ धावा, विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स (२०१८)
अशोक दिंडा – २९ धावा, विरुद्ध मुंबई इंडियन्स (२०१७)
महत्त्वाच्या बातम्या-
-संघाचा डाव सावरत असलेले दिल्लीचे २ मोहरे झाले सलग बाद, पण ‘हा’ खेळाडू ठरला गेमचेंजर
-केएल राहुलचा कर्णधार म्हणून पहिला निर्णय क्षेत्ररक्षणाचा, या धुरंदरला केले बाहेर
-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे सामन्यात पडला फरक; सेहवागने दिली प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-यावर्षी सीएसकेसाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो ‘हा’ अष्टपैलू खेळाडू
-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान
-श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा