भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा भारतातील एक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. धोनीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र तरी आजही चाहत्यांमध्ये त्याची नेहमीच चर्चा होत असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्त झाला असला तरी आयपीएल मध्ये मात्र तो खेळत असतो.
मात्र यंदाचा आयपीएल हंगाम मध्यातच स्थगित झाल्याने धोनी फारसा चाहत्यांसमोर येत नाही आहे. तो सध्या रांचीतील त्याच्या घरी कुटुंबासह वेळ घालवतो आहे. त्यामुळे त्याची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशातच धोनीची एक झलक समोर आली आहे. त्यातील धोनीचे रूप पाहून चाहत्यांमध्ये भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत.
धोनीचा नवा लूक आला समोर
एमएस धोनीचा एक नवीन फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. ज्यात धोनीचा नवीन लूक समोर आला आहे. मात्र हा नवीन लूक पाहून चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या फोटोत धोनीची दाढी वाढल्याचे दिसून येते आहे. परंतु पांढरी दाढी वाढल्याने धोनी वयापेक्षा अधिक म्हातारा झाल्याचे वाटते आहे.
https://www.instagram.com/p/CPOWyOCtB9d/?utm_source=ig_embed&ig_rid=1baa7cf1-e7c5-4b67-add9-b9fd7e5db0b6
Mahi & his love ❤️#MSDhoni #Dhoni @msdhoni pic.twitter.com/ozpU6IuG7s
— Dhoni Raina Team (@dhoniraina_team) May 23, 2021
चाहत्यांच्या आल्या भन्नाट प्रतिक्रिया
धोनीचा हा लूक पाहून चाहत्यांच्या त्यावर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी म्हंटले आहे की त्यांचा आवडता खेळाडू धोनी आता म्हातारा होत चालला आहे. तर धोनीची वाढलेली दाढी आणि केस पाहून काही लोकांनी सध्या सगळेच लोक केस कापण्यासाठी संघर्ष करत असल्याचे म्हंटले आहे.
धोनीची शानदार कारकीर्द
एमएस धोनीची भारतासाठी खेळाडू म्हणून कारकीर्द तर शानदार राहिली आहेच. मात्र कर्णधार म्हणून पण त्याची कारकीर्द अतिशय यशस्वी ठरली आहे. भारतीय संघाला त्याने वनडे विश्वचषक, टी२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी यासारखी अनेक मोठी विजेतेपदे मिळवून दिली आहे. तो भारताचाच नाहीतर जागतिक क्रिकेटमधील एक सर्वाधिक यशस्वी आणि सार्वकालीन महान कर्णधार म्हणून ओळखला जातो.
महत्त्वाच्या बातम्या –
निवड समीतीला पाँटिंगला करायचे होते संघाबाहेर; पण मायकल क्लार्कने केला बचाव, स्वत:च केला खुलासा
“कशाला पुढच्या जन्माची चिंता करतोस?”, कैफचा युवराजच्या ‘त्या’ कमेंटवर रिप्लाय
ऑक्सीजन सिलेंडर लावून स्वयंपाक बनवणाऱ्या आईची मदत करणार वीरू; सोशल मीडियावर केले ‘हे’ आवाहन