मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू कायरन पोलार्ड याने आशा व्यक्त केली आहे की, त्याचा संघ यूएईमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे या मोसमातही चषक जिंकेल. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होण्यासाठी पोलार्ड गुरुवारी (१६ सप्टेंबर) रात्री अबुधाबीला पोहोचला आहे. आयपीएलसाठी युएईत येताच त्याने आयपीएलमधील सर्व विरोधी संघांना इशारा दिला आहे. १९ सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याने राहिलेल्या हंगामाची सुरुवात होणार आहे.
पोलार्ड म्हणाला, ‘मी उर्वरित हंगामासाठी उत्साहित आहे. आम्हाला आशा आहे की, आम्ही गेल्यावर्षी येथे जे केले तेच पुन्हा करू शकू. गेल्यावर्षीच्या आमच्याकडे चांगल्या आठवणी आहेत.”
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात पोलार्डने ७ सामन्यांत ५६ च्या सरासरीने १६८ धावा केल्या आहेत. त्याने गोलंदाजीत ३ विकेट्सही घेतल्या आहेत. कॅरेबियन प्रीमियर लीग संपल्यानंतर पोलार्ड येथे आला आहे आणि संघात सामील होण्यापूर्वी त्याला दोन दिवस विलगिकरनात राहावे लागेल. ५ वेळचा विजेता संघ मुंबई इंडियन्स रविवारी दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात ३ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) सामना करेल. मुंबईचा संघ सध्या ७ सामन्यांत ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने विक्रमी ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे आणि पुन्हा एकदा ते सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करतील. गेल्यावर्षी म्हणजेच आयपीएलच्या १३ व्या मोसमात अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला होता. या सामन्यात अनुभवी रोहित शर्माने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत पाचवे जेतेपद जिंकले होते. दिल्लीने प्रथमच प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
दुसरीकडे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने, सीएसकेला मुंबई इंडियन्सऐवजी यावेळी विजयाचा मोठा दावेदार म्हटले केले आहे. त्याने रोहितच्या संघाला युएईच्या दुसऱ्या टप्प्यात हळू सुरुवात न करण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो होऊ शकतो, असाही इशारा त्याने दिला आहे. मुंबईचा संघ सुरुवातीला संथ खेळतो, परंतु नंतर हा संघ वेग घेतो आणि स्पर्धा जिंकून येतो.
महत्त्वाच्या बातम्या-
‘झिरों’मध्ये नंबर १ आहेत रोहित, रायुडूसह ‘हे’ ५ क्रिकेटर; अजून फक्त १ चूक, मग मोडतील नकोसा रेकॉर्ड
सीएसकेविरुद्धच्या मोठ्या लढतीपूर्वी ‘हिटमॅन’ने बदलला गियर, क्वारंटाईन संपवून सुरू केला सराव
न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने संतापले पाकिस्तानी चाहते; म्हणे, ‘क्राइस्टचर्चचा गोळीबार विसरलात का?’