भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने 188 धावांच्या मोठ्या अंतराने नावावर केला. पण दुसऱ्या सामन्यात मात्र बांगलादेश संघ विजयासाठी पूर्ण प्रयत्न करेल. उभय संघांतील हा दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना ढाकाच्या शेर ए बांगला स्टेडियमवर खेळला जाणार आहे. गुरुवारी (26 डिसेंबर) सुरू होणाऱ्या या सामन्यापूर्वी बांगलादेश संघात एक महत्वाचा बदल झाला आहे. त्यांचा फिरकीपटू नसुम अहमद याला संघात घेतले गेले आहे.
बांगलादेश संघाने त्यांच्या 15 सदस्यीय संघात दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी हा महत्वाचा बदल केला आहे. नसुम अहमद (Nasum Ahmed) याला भारताविरुद्ध गुरुवारी सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात या फॉरमॅटमध्ये पदार्पणाची संधीही मिळू शकते. 28 वर्षीय नसुम अहमद आंंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 आणि 20 षटकांचे सामने खेळला आहे, असोटी फॉरमॅटमध्ये त्याला अद्याप पदार्पण करण्याची संधी मिळाली नाहीये. त्याने आतापर्यंत बांगलादेशसाठी 28 आंतरराष्ट्रीय टी-20 आणि 4 वनडे सामने खेळले आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये नसुमने 20.03च्या सरासरीने आणि 7.08 च्या इकोनॉमी रेटने 32 विकेट्स घेतल्या आहेत. तर वनडे फॉरमॅटमध्ये त्याने 3.39 च्या इकोनॉमी रेटने 5 विकेट्स घेतल्या आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्यातू शाकिब अल हनस माघार घेण्याची शक्यता
बांगलादेश संघाचे मुख्य प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, “कर्णधार शाकिब अल हसन गोलंदाजी करेल, याची शक्यता कमी दिसत आहे. याविषयी सध्या मी काहीच सांगू शकत नाही की, तो गोलंदाजी करेल की नाही. शाकिब दुसऱ्या वनेड सामन्यात उमरान मलिकच्या शॉर्ट चेंडूवर दुखापतग्रस्त झाला. त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि सोबतच त्याच्या बरगड्यांमध्येही वेदना होत होत्या.” दरम्यान, याच कारणास्तव शाकिबने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी केली नाही. (Nasum Ahmed has been included in the Bangladesh squad for the second Test against India)
The Bangladesh Cricket Board (BCB) announces the squad for the second Test (22-26 December 2022) against India at the Sher-e-Bangla National Cricket Stadium, Mirpur.#BCB | #Cricket | #BANvIND pic.twitter.com/yaN9sVRGq3
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 18, 2022
दुसऱ्या कसोटीसाठी निवडलेला बांगलादेश संघ –
शाकिब अल हसन (कर्णधार), महमूदुल हसन जॉय, नजमुल हुसैन शंटो, मोमिनुल हक, यासिर अली, मुशफिकुर रहीम, लिटन दास, नुरुल हसन, मेहदी हसन मिराज, ताइजुल इस्लाम, तस्कीन अहमद, खालिद अहमद, जाकिर हसन, रेजौर रहमान राजा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्ध सलग तिसऱ्या कसोटीत हॅरी ब्रूकचे शतक, मोडला रणजीत सिंग यांचा 125 वर्षांपूर्वीचा विक्रम
“असल्या खेळपट्ट्या खेळायला देतात का?”; दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार भडकला; पंचांवरही लावले आरोप