क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात (कसोटी, वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२०) अनेक खेळाडू पहायला मिळतात. यापैकी काही खेळाडू धडाकेबाज फलंदाजी करतात. तर काही खेळाडू आपली खेळी सावकाश पुढे घेऊन जातात.
इतकेच नव्हे तर काही खेळाडू गोलंदाजाच्या खराब चेंडूची वाट पाहतात. संपूर्ण डाव संपला तरीही ते षटकार मारण्यात विश्वास ठेवत नाहीत. भारताबरोबरच जगात असे काही खेळाडू आहेत ज्यांनी क्वचितच षटकार मारले असतील. तर काही खेळाडू असेही आहेत, ज्यांनी आपल्या कारकीर्दीत एकही षटकार मारलेला नाही.
वनडे कारकीर्दीत एकही षटकार न मारलेले ५ खेळाडू- (5 batsmen who hit no sixes in their ODI careers)
कॅलन फर्ग्युसन-
ऑस्ट्रेलियाकडून कॅलन फर्ग्युसनने ३० वनडे सामने खेळले. यात त्याने ५ अर्धशतकांच्या मदतीने ६६३ धावा केल्या. ३० वनडे सामन्यांत ६४ चौकार मारणाऱ्या फर्ग्युसन कारकिर्दीत एकही षटकार मारता आला नाही.
सर जेफ बाॅयकाॅट-
सर जेफ बाॅयकाॅट यांनी इंग्लंडकडून ३६ वनडे सामन्यांत एका शतकाच्या मदतीने १०८२ धावा केल्या. कारकिर्दीत त्यांनी ८४ चौकार मारले परंतु ३६ सामन्यात त्यांनी षटकार मारला नाही.
थिलान समरवीरा-
श्रीलंकेचा फलंदाज थिलान समरवीराने (Thilan Samarweera) वनडे कारकीर्दीत (ODI Career) ५३ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ८६२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ शतके केली आहेत. तसेच ५३ सामन्यात ७४ चौकार मारताना एकाही षटकार मात्र मारलेला नाही.
डियोन इब्राहिम-
झिंबाब्वेचा फलंदाज डियोन इब्राहिमने (Dion Ebrahim) ८२ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १४४३ धावा केल्या आहेत. यामध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. १०४ चौकार मारणाऱ्या या खेळाडूने कधीही वनडे कारकिर्दीत एकही षटकार मात्र मारला नाही.
मनोज प्रभाकर-
भारतीय संघाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar) यांनी आपल्या १२ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत भारतासाठी १३० वनडे सामने खेळले आहेत. २४च्या सरासरीने त्यांनी यात १८५८ धावाही केल्या. त्यांनी २ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु त्यांनी आपल्या वनडे कारकीर्दीत एकदाही षटकार मारलेला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ज्या मैदानावर युवराजने मारले षटकार, ते झालंय आता थेट जेल
-भारतीय संघात हा खेळाडू आहे सर्वात फनी क्रिकेटर
-टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले दिग्गज