आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दर वर्षाच्या शेवटी त्या-त्या प्रकारातील सर्वोत्तम खेळाडूंना पुरस्कृत करते. यंदाही तेच लक्ष्य असल्याने आयसीसी सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूंच्या नामांकनाची यादी जाहीर करत आहे. गुरूवारी (29 डिसेंबर) आयसीसीने ‘पुरूष वनडे क्रिकेटर ऑफ द इयर’ या प्रकारची यादी जाहीर केली. जी पाहून भारतीय चाहत्यांना धक्का बसेल. या यादीत ज्या चार खेळाडूंच्या नावांचा आयसीसीने उल्लेख केला आहे, त्यामध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.
या यादीत सर्वप्रथम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचा क्रमांक आहे. त्याने मागील वर्षीही हा पुरस्कार जिंकला असून यंदाही त्याचा जिंकण्याचा निर्धार आहे. तो वनडेमध्ये किती जबरदस्त आहे हे त्याने त्याच्या कामगिरीतून दाखवले आहे. तो जुलै 2021पासून आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर तळ ठोकून बसला आहे. त्याने यावर्षी 9 वनडे सामने खेळताना 84.87च्या सरासरीने 679 धावा केल्या आहेत. नेतृत्वातही त्याने कमाल केली. यावर्षी त्याने तीन पैकी सर्व मालिका जिंकल्या आहेत. यातील केवळ एकच सामना गमावला, तोही ऑस्ट्रेलियाविरुद्ध
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ऍडम झम्पा आहे. या फिरकीपटूने 2016मध्ये पदार्पण केले. त्याने यावर्षी 12 पैकी 9 सामने घरच्या मैदानावर खेळले, जे फिरकीपटूंसाठी कठीण होते आणि चांगली कामगिरी केली. त्याने 12 सामन्यात 30 विकेट्स घेतल्या.
👀 Two stylish batters
💫 A spin-bowling wizard
🔥 An all-round superstarWe have some exciting talents as our ICC Men's ODI Cricketer of the Year nominees.#ICCAwards | Find out 👇
— ICC (@ICC) December 29, 2022
सिकंदर रझा (Sikandar Raza) याच्यासाठी हे वर्ष उत्तम ठरले. त्याला आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले आहे. त्याने आपल्या अप्रतिम खेळीने झिम्बाब्वे क्रिकेटला यावर्षी नव्या उंचीवर नेले. या 33 वर्षीय खेळाडूने यावर्षी वनडेत 3 शतकी खेळी केल्या, ज्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच्या बॅटमधून निघाल्या. त्याने 15 सामन्यात 645 धावा करताना 8 विकेट्सही घेतल्या.
वेस्ट इंडिज यावर्षी टी20मध्ये नाही चमकले, मात्र त्याच्या एका खेळाडूने वनडे क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. विकेटकीपर-फलंदाज शाय होप याने 21 सामन्यात 709 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तो यावर्षी वेस्ट इंडिजसाठी एकटाच लढला असे चित्र दिसले. कारण त्याने 4 पन्नास पेक्षा अधिक धावा पराभव झालेल्या सामन्यात केल्या. (Nominees for ICC ODI cricketer of the year 2022 revealed)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संजू सॅमसनची त्याच्याच पेंटिंगसमोर बॅटिंग, फोटो होतोय व्हायरल
श्रीलंकेविरुद्ध भारत करणार नव्या वर्षाचे स्वागत! जाणून घ्या मालिकेचे वेळापत्रक, संघ एकाच क्लिकवर