Loading...

पीएमडीटीए-केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरिज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत श्रेया पठारे, अविपशा देहुरी, आरुष मिश्रा यांचे विजय

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व फ्युचर प्रो टेनिस अकादमी यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरीज मानांकन टेनिस 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रेया पठारे, अविपशा देहुरी, यशश्री पाटील यांनी तर, 14 वर्षाखालील मुलांच्या गटात आरुष मिश्रा, अभिराम निलाखे, आदित्य कामत यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

येरवडा येथील फ्युचर प्रो टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात पहिल्या फेरीत श्रेया पठारे व अविपशा देहुरी यांनी अनुक्रमे आदिती सागवेकर व ध्रुवा माने यांचा 6-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून आगेकूच केली. यशश्री पाटीलने आर्या पुलटेवर 6-3 असा विजय मिळवला.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात अभिराम निलाखेने अर्जुन वेल्लूरीला 6-1 असे पराभूत केले. आरुष मिश्रा याने पार्थ काळेला 6-2 असे नमविले. आदित्य कामतने ध्रुव डोगराचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

12 वर्षाखालील मुले:

Loading...

पहिली फेरी:

विश्वजीत सणस वि.वि.चिन्मय ठाकरे 6-0;
राजीव पडाळे वि.वि.विवान शंकर 6-3;
क्रीशांक जोशी वि.वि.सय्यम पाटील 6-3;
वेदांत खानवलकर वि.वि.शुभांग सिन्हा 6-0;
समिहन देशमुख वि.वि.प्रत्युश बगाडे 6-1;

Loading...

12 वर्षाखालील मुले:

पहिली फेरी:

श्रेया पठारे वि.वि.आदिती सागवेकर 6-0;
अविपशा देहुरी वि.वि.ध्रुवा माने 6-0;
यशश्री पाटील वि.वि.आर्या पुलटे 6-3;

14वर्षाखालील मुले:

पहिली फेरी:

आदित्य कामत वि.वि.ध्रुव डोगरा 6-4;
अथर्व जोशी वि.वि.देवदत्ता पाटील 6-2;
राजचंद्र त्रिमुखी वि.वि.अझलन दुरानो 6-2;
रियान मुजगुले वि.वि.नीरज जोर्वेकर 6-3;
शिवांश कुमार वि.वि.मित प्रवीण 6-0;
अमोघ दामले वि.वि.आर्या वेलणकर 6-2;
अथर्व राऊत वि.वि.रानवडे 6-2;
सनत कडले वि.वि.वैष्णव रानवडे 6-4;
अभिराम निलाखे वि.वि.अर्जुन वेल्लूरी 6-1;
आरुष मिश्रा वि.वि.पार्थ काळे 6-2.

Loading...
You might also like
Loading...