कोणत्याही स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना झाल्यावर त्याची ओळख आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणून होते. जगात अनेक असे देश आहे जिथे अतिशय मोजकी मैदाने आहेत तर भारतासारख्या देशात क्रिकेटची अनेक मैदाने आहेत.
भारतातील प्रत्येक स्टेडियमला कसोटी दर्जा मिळालेला नसला तरीही भारतात अनेक मैदान आहेत जिथं टी२० किंवा वनडे सामने झाले आहेत. तसेच भारतात २९ मैदानांवर आंतरराष्ट्रीय कसोटी सामने झाले आहेत. श्रीलंकेत ८, ऑस्ट्रेलियात ११ तर दक्षिण आफ्रिकेत ११ कसोटी मैदानांवर आजपर्यंत सामने झाले आहेत. Players to score most runs on a single ground.
कोणताही देश हा शक्यतो मायदेशात किंवा विरोध संघाविरुद्ध त्यांच्यादेशात कसोटी सामने खेळतो. त्यामुळे जवळपास ५० टक्के कसोटी सामने हा कोणताही संघ मायदेशात खेळतो. ज्या देशात स्टेडियमची संख्या कमी आहे अर्थातच तिथे एकाच स्टेडियमवर खेळाडूंकडून धावांचा किंवा विकेट्सचा विक्रम सहज होतो.
या लेखात कसोटीत एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची आपण माहिती घेणार आहोत.
५. ग्रॅहम गुच (२०१५ धावा), लाॅर्ड्स, लंडन
ग्रॅहम गुच यांनी लंडनमधील लाॅर्ड्स मैदानावर १९७५ ते १९९४ या काळात २१ सामन्यात ३९ डावांत ५३.०२च्या सरासरीने २०१५ धावा केल्या. यात त्यांच्या ६ शतके व ५ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी कारकिर्दीतील २२ टक्के धावा त्यांनी या मैदानावर केल्या आहेत.
४. जॅक कॅलिस (२१८१ धावा), न्यूलॅंड, केपटाऊन
जॅक्युस हेन्री कॅलिस यांनी १९९६ ते २०१३ या काळात न्यूलॅंड केपटाऊन येथे २२ सामन्यात ३५ डावांत फलंदाजी करताना ७२.७०च्या सरासरीने २१८१ धावा केल्या आहेत. यात त्याने येथे ९ शतके व ९ अर्धशतकेही केली आहेत. त्याने कसोटी कारकिर्दीतील १६ टक्के धावा या मैदानावर केल्या आहेत.
३. कुमार संगकारा (२३१२ धावा), सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राऊंड, कोलंबो
कुमार चोक्षनादा संगकाराने सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राऊंड, कोलंबो येथे २२ कसोटी सामन्यात ३४ डावात फलंदाजी करताना ७४.५८च्या सरासरीने २३१२ शतके केली आहेत. यात त्याने ८ शतके व ७ अर्धशतकांचा समावेश आहे. कारकिर्दीतील १८.६४ टक्के धावा त्याने या मैदानावर केल्या आहेत. याच स्टेडियमवर कुमार संगकारा कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.
२. माहेला जयवर्धने (२३८२ धावा ), गाॅल आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गाॅल
देनागामागे प्रोबोथ माहेला डि सिल्वा जयवर्धने अर्थात माहेला जयवर्धनेने गाॅल आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गाॅलवर १९९८ ते २०१४ या काळात २३ कसोटी सामने खेळले. यात त्याने ३७ डावात फलंदाजी करताना ७०.०५च्या सरासरीने २३८२ धावा केल्या. यात त्याने ७ शतके व १२ अर्धशतके केली आहेत. जयवर्धनेने कारकिर्दीतील २० टक्के धावा या स्टेडियमवर केल्या आहेत.
१. माहेला जयवर्धने (२९२१ धावा ), सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राऊंड, कोलंबो
ज्या स्टेडियमवर कुमार संगकाराने २३१२ धावा केल्या त्याच स्टेडियमवर २९२१ धावा करण्याचा विक्रम हा माहेला जयवर्धनेच्या नावावर आहे. जयवर्धनेने सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राऊंड, कोलंबो येथे २७ कसोटीत ४२ डावात फलंदाजी करताना ७४.८९च्या सरासरीने २९२१ धावा केल्या आहेत. १९९७ ते २०१४ या काळात येथे फलंदाजी करताना त्याने ११ शतके व ९ अर्धशतके केली आहेत. कारकिर्दीतील २४ टक्के धावा त्याने या मैदानावर केल्या आहेत. सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राऊंड, कोलंबो व गाॅल आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गाॅल या दोन मैदानावर मिळून जयवर्धनेने कसोटी कारकिर्दीतील ४४ टक्के धावा केल्या आहेत. जयवर्धने कारकिर्दीतील पहिला व शेवटचा सामना सिंहली स्पोर्ट्स क्लब ग्राऊंड, कोलंबोवरच खेळला.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
–गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण