सध्या भारतीय क्रिकेट संघ वनडे विश्वचषकाची तयारी करत आहे. या विश्वचषकात भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारताच्या या विश्वचषक मोहिमेमध्ये फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याचे योगदान महत्त्वाचे असेल. असे असताना सोशल मीडियावर श्रेयस आणि दक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे हे विश्वचषकानंतर लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
Pooja Hegde in love with a famous cricketer from Mumbai and they would get married soon ..
— ???????????????????????????????????? ???????????????????? (@kollywoodtalks) September 26, 2023
श्रेयस सध्या भारतीय क्रिकेट संघाचा नियमित सदस्य आहे. भविष्यात तो भारतीय संघाचा कर्णधार देखील होऊ शकतो. असे असताना त्याचे नाव आतापर्यंत कोणाशीही जोडले गेले नव्हते. मात्र, मागील काही दिवसांपासून पूजा हेगडे व त्याच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पूजा ही एका भारतीय क्रिकेटपटूला डेट करत असल्याची बातमी आली होती. त्यानंतर आता हा क्रिकेटपटू श्रेयस असल्याचे काही माध्यमांनी वृत्त दिले आहे. तसेच हे दोघे विश्वचषानंतर लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे देखील बोलले जातेय.
पूजा हेगडे ही दाक्षिणात्य चित्रपटातील मोठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसेच मागील काही वर्षांपासून तिने बॉलीवूडमध्ये देखील आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलीवूडमधील अनेक मोठ्या स्टार सोबत तिने काम केले असून, ऋतिक रोशन याच्यासोबत तिने मोहंजदारो चित्रपटातून तिने पदार्पण केलेले. याव्यतिरिक्त हाउसफुल 4, सर्कस व किसी का भाई किसी का जान या चित्रपटांमध्ये तिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
(Pooja Hegde Date Cricketer Shreyas Iyer Source)
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिरडत अफगाणिस्तानचा जबरदस्त विजय, अंतिम सामन्यात ऋतुराजसेनेशी भिडणार
विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने जिंकला टॉस; बाबर म्हणाला, ‘आम्ही आज 300…’