इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५ व्या हंगामात युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ चमक दाखवू शकला नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या या सलामीवीराने हंगामात १० सामने खेळले आणि २८.३० च्या सरासरीने एकूण २८३ धावा केल्या. त्याने २ अर्धशतके झळकावली पण काही महत्त्वाच्या प्रसंगी तो स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. पुढे त्याला टायफॉइड झाला त्यामुळे त्याला काही सामन्यांतून बाहेर व्हावे लागले. आता पृथ्वी रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.
पृथ्वी शॉ ने सोमवारी उत्तराखंडविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी सलामीवीर म्हणून खेळायला आला. मात्र, पहिल्या डावात तो फक्त २१ धावा करून त्रिफळाचित झाला. त्याला उत्तराखंडचा मध्यमगती गोलंदाज दीपक धापोलाने बाद केले, त्यामुळे मुंबईची पहिली विकेट ३६ धावांवर गेली. पृथ्वीने २० चेंडूंच्या खेळीत ४ चौकार लगावले, मात्र तो विशेष कामगिरी करू शकलेला नाही.
कर्णधार म्हणून पृथ्वीने चांगली खेळी करावी अशी संघव्यवस्थापन आणि संघातील खेळाडूंना ाशा होती. मात्र, पृथ्वीने त्यांच्या आशांचा भ्रमनिरास केला आहे. पृथ्वी बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वालही ३५ धावा करून दीपकच्या गोलंदाजीवर बाद झाला. डावाच्या १५व्या षटकातील चौथ्या चेंडूवर स्वप्नील सिंगने त्याचा झेल घेतला. यशस्वीने ४५ चेंडूत ६ चौकार मारले. मुंबई संघाच्या ६४ धावांवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. पुढे मुंबईकडून खेळत असताना सरफराज खान याने नाबाद ६९ आणि सुवेद पारकर याने नाबाद १०४ धावा करून मुंबईचा डाव सावरला. मुंबईने पहिल्या दिवस अखेरीस मुंबईच्या संघाने ३ बाद ३०४ धावा काढल्या आहेत.
तत्पूर्वी, पाऊस आणि खराब हवामानामुळे मुंबई विरुद्ध उत्तराखंड रणजी करंडक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामना ओल्या आउटफिल्डमुळे लांबणीवर पडला होता. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी कर्नाटक विरुद्ध यूपी आणि पंजाब विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यातील सामनेही उशिरा सुरू झाले.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबो ! रुटची बॅटपण राहते “स्वत:च्या पायावर उभी,” पाहा व्हिडिओ
हे भारीये! जेव्हा नदालने जिंकलेले पहिले फ्रेंच ओपन, तेव्हा आजचा उपविजेता होता केवळ ‘इतक्या’ वर्षांचा
कडकडून मिठी अन् कौतुक! लॉर्ड्सवर शतक करणाऱ्या रुटचे कर्णधार स्टोक्सकडून ‘ग्रँड वेलकम’