सध्या भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहत आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वात नुकताच बदल करण्यात आला. त्यासोबतच संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ (team India head coach and support staff) यांच्या जागी देखील नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जवळपास आठ वर्षे भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक राहिलेल्या आर श्रीधर (R Sridhar) यांनी एका मुलाखतीत बोलताना आपले भारतीय संघासोबतचे अनेक अनुभव सांगितले. त्यांनी या मुलाखतीत रवींद्र जडेजा याला सध्याचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरविले. (Ravindra Jadeja is world’s best fielder)
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्रीधर म्हणाले,
“मला विचाराल तर सध्या जडेजा जगातील सर्वोत्तम प्रशिक्षक आहे. ८० च्या दशकात अशीच कामगिरी मोहम्मद अजहरुद्दिन (Mohammad Azharuddin) हे करत. जडेजा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना वेगळा भासतो. त्याचा दर्जा सध्याचा इतर क्षेत्ररक्षकांपेक्षा वेगळा आहे.”
श्रीधर यांनी सध्याचे क्रिकेट व ८०-९० च्या दशकातील क्रिकेटची तुलना करताना आता परिस्थिती व तंत्रज्ञान बदलल्याचे म्हटले.
भारतीय क्रिकेटमध्ये चापल्य व क्षेत्ररक्षण संस्कृती रुजवण्याचे श्रेय त्यांनी मोहम्मद अझरुद्दीन यांना दिले. ते म्हणाले,
“८० च्या दशकात जेव्हा अज्जू भाईने पदार्पण केले होते, तेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसची कसलीच परंपरा नव्हती. ही परंपरा ९० च्या दशकाच्या शेवटी सुरू झाली आणि अज्जू भाई त्यांच्या तंदुरुस्तीच्या कारणास्तव सर्वापेक्षा वेगळे होते. कारण, त्यांचे हात आणि थ्रो अप्रतिम होता. त्यांनी त्यांचा वेगळा ठसा उमटविला होता. भारतीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण संस्कृती रुजवण्याचे काम त्यांनी केले.”
श्रीधर यांनी २०१४ ते २०२१ या काळात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्याच मार्गदर्शनाचा आपल्याला फायदा झाला असल्याचे अनेक वरिष्ठ भारतीय क्रिकेटपटू सांगत असतात. रवी शास्त्री यांच्यासह श्रीधर यांनी देखील यापुढे भारतीय संघासोबत काम करण्यास नकार दिला होता. त्यांच्या जागी आता टी दिलीप यांची नियुक्ती झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन संघाच्या आनंदावर विरजण! ‘हा’ प्रमुख गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर