राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज यष्टीरक्षक सलामीवीर जोस बटलर मंगळवारी शारजामध्ये होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.
इतर इंग्लिश आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू १७ सप्टेंबर रोजी इंग्लंडहून युएईला दाखल झाले. कोविड-१९ ची नकारात्मक चाचणी आल्यानंतर आणि ३६ तासांचे विलगीकरण पूर्ण केल्यावर सर्व खेळाडूंना संघांच्या प्रशिक्षणामध्ये भाग घेण्यास आणि सामने खेळण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, बटलर आपल्या कुटुंबासमवेत आला असल्याने, त्याला नियमानुसार, सहा दिवसांचे विलगीकरण बंधनकारक आहे.
इंग्लंडच्या या आक्रमक फलंदाजाने इन्स्टाग्राम लाइव्ह दरम्यान चाहत्यांशी बातचीत करताना सांगितले की,
“चेन्नई विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मी उपलब्ध नसेल. सध्या मी कुटुंबासोबत विलगीकरण कक्षात आहे. मी राजस्थान व्यवस्थापनाचे आभार मानतो की, त्यांनी मला माझ्या परिवाराला सोबत आणण्याची परवानगी दिली.”
बेन स्टोक्सविषयी विचारले असता बटलर म्हटला, “तो त्याच्या कुटुंबासमवेत काही काळ घालू इच्छित आहे. मी आशा करतो की, तो लवकरच संघात दाखल होईल.”
२०१८ मध्ये पहिल्यांदा राजस्थान रॉयल्समध्ये सहभागी झाल्यापासून बटलर राजस्थानचा प्रमुख खेळाडू आहे. त्याने २०१८ मध्ये ५४८ तर २०१९ मध्ये ३११ धावा काढत राजस्थानला अनेक सामने एकहाती जिंकून दिले होते. आयपीएलच्या तेराव्या हंगामात राजस्थानला विजेतेपद मिळवायचे असेल तर, बटरलरला मागील दोन हंगामातील कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-केएल राहुलचा कर्णधार म्हणून पहिला निर्णय क्षेत्ररक्षणाचा, या धुरंदरला केले बाहेर
-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे सामन्यात पडला फरक; सेहवागने दिली प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
-यावर्षी सीएसकेसाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो ‘हा’ अष्टपैलू खेळाडू
-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान
-श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा