अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (२७ मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून अंतिम सामन्यात जागा पक्की करण्याची या दोन्ही संघांकडे संधी असणार आहे. पण या सामन्यापूर्वी आर अश्विनबद्दल माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्या मते, आर अश्विन (R Ashwin) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) संघर्ष करताना दिसू शकतो. त्यांच्या म्हणण्यानुसार या स्टेडियमवरील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी फारशी मदतगार नाही. अश्विन आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) खेळतो. तसेच तो संघातील युजवेंद्र चहलसह महत्त्वाचा फिरकीपटू आहे.
मांजरेकर इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले, ‘सपाट खेळपट्टीवर आर अश्विन राजस्थान रॉयल्स संघासाठी एक समस्या आहे, कारण तो खुप जास्त विविधता वापरतो. आशावेळी तो खूप कमी ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. पण खेळपट्टीवर जिथे वळण मिळते, तिथे तो धोकादायक बनतो. जर खेळपट्टी फिरकीला अनुकूल असती, तर राजस्थानला फायदा झाला असता. कारण त्यांचे चहल आणि अश्विन हे दोघे एकसाथ गोलंदाजी करतात.’
अश्विनने या आयपीएल हंगामात १५ सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या आहेत आणि १८५ धावा केल्या आहेत. त्याने गोलंदाजीव्यतिरिक्त फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे.
याशिवाय मांजरेकर यांनी अखेरच्या षटकांमधील गोलंदाजी राजस्थानसाठी डोकेदुखी ठरल्याचे म्हटले आहे. मांजरेकर म्हणाले, ‘अखेरच्या षटकांमधील गोलंदाजी राजस्थानसाठी कमजोरी ठरली आहे. ट्रेंट बोल्ट विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. पण त्यांनी त्याचा वापर नवीन चेंडू असताना करायला हवा, कारण अखेरच्या षटकांमध्ये त्याची आकडेवारी फारशी चांगली नाही. त्यांनी प्रसिद्ध कृष्णाला पाठिंबा दिला, ज्याने स्पर्धेत चांगली कामगिरी केली. ओबेड मॅकॉय सरप्राईज पॅकेज ठरला आहे. त्याच्याकडूनही संघाला चांगल्या प्रदर्शनाची आशा असेल. रियान परागव्यतिरिक्त त्यांच्याकडे सहाव्या गोलंदाजाचा पर्याय नाही.’
राजस्थान रॉयल्सने साखळी फेरीत १४ सामन्यांपैकी ९ सामने जिंकत गुणतालिकेत दुसरा क्रमांक मिळवला होता. त्यामुळे ते गुजरात टायटन्स विरुद्ध पहिला क्वालिफायर सामना खेळले. त्यात त्यांना ७ विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्सला दुसरा क्वालिफायर सामना खेळावा लागणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मला बघणं बंद कर आणि बॉल टाक; जेव्हा धोनीला पहिल्यांदा भेटला होता ‘हा’ भारतीय गोलंदाज, वाचा किस्सा
धक्कादायक! वृद्धिमान साहाने अर्ध्यातच सोडली संघाची साथ, व्हॉट्सऍप ग्रूपमधूनही गायब
हमारी छोरियां छोरो से कम है के? राधा यादवचा झेल बघून तुम्ही पण व्हाल दंग