मुंबईत प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवत टेनिस स्पर्धा पार पडली. प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाच्या टेनिस स्पर्धेत 16 वर्षाखालील गटात अंधेरीच्या ज्ञानकेंद्र शाळेच्या रिहान पटेलने तर विबग्योरच्या अधिरा गुप्ताने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत बाजी मारली. तसेच धीरूभाई अंबानी शाळेच्या (13 गुण) दहा वर्षाखालील आणि 12 वर्षाखालील मुलांच्या गटात खेळाडूंनी जेतेपदाची कामगिरी करीत आपल्या शाळेला सांघिक विजेतेपदही मिळवून दिले. अंधेरीच्या ज्ञानकेंद्र शाळेला (10गुण) सांघिक उपविजेतेपद मिळविता आले. या स्पर्धेत एकंदर 25 शाळांमधील 70 मुले आणि 40 मुलींचा सहभाग होता.
प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा निकाल :
16 वर्षाखालील मुले : रिहान पटेल (ज्ञानकेंद्र, अंधेरी) वि. केदार महाडिक (यशोधाम) 8-0 ;16 वर्षाखालील मुली: रिवा मेहता (विबग्योर रुटस) वि. अधिरा गुप्ता (पवार पब्लिक) 8-2 ;
14 वर्षाखालील मुले : जोएब पटेल ( ज्ञानकेंद्र, अंधेरी) वि. धैर्य निर्मल (हिरानंदानी ) 8-1; 14 वर्षाखालील मुली: रिद्धी शिंदे (लक्षधाम) वि. शिक्षा पांडे (विद्याप्रसारक) 8-0
12 वर्षाखालील मुले : विद्युत सुंदर (धीरुभाई अंबानी) वि. अंश जलोटा (छत्रभूज नरसी) 8-7 ; 12 वर्षाखालील मुली: श्रेया शेट्टी (रूस्तमजी इंटरनॅशनल) वि. इरा पांडे (धीरूभाई अंबानी) 8-4
10 वर्षाखालील मुले : अरूष खन्ना (धीरुभाई अंबानी) वि. कौस्तुभ पाध्ये (विवेक विद्यालय) 8-1 ; 10 वर्षाखालील मुली : ध्याना राणावत (विबग्योर रुटस) वि. राहा चौधरी (विबग्योर हाय) 8-1.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट विरुद्ध सचिन वादात गांगुलीची उडी! म्हणाला, ‘असेच कोणीही 45 शतके…’
शानदार उद्घाटन सोहळ्याने वाजले हॉकी वर्ल्डकप 2023 चे बिगूल, विश्वविजयासाठी भिडणार 16 संघ