फ्लोरिडा येथे झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा (WIvsIND) ५९ धावांनी पराभव केला. यामुळे भारताने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माने जेव्हापासून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी घेतली आहे, तेव्हापासून भारताने एकही टी२० मालिका गमावलेली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने लागोपाठ ८ मालिका जिंकल्या आहेत. हा सामना जिंकताच त्याने मोठा पराक्रमही केला आहे.
नियमित कर्णधार रूपाने रोहितच्या जिंकण्याची टक्केवारी ८२.८५ आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने फक्त तीनच सामने गमावले आहेत. यातील प्रत्येकी १-१ सामने इंग्लड विरुद्ध हरले आहेत. त्यात एक वनडे आणि एक टी२० सामन्याचा समावेश आहे. तर एक सामना वेस्ट इंडिज विरुद्ध गमावला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ५ मालिकेत विरोधी संघाला सळो की पळो करून सोडले आहे.
रोहित शर्मा भारताच्या नियमित कर्णधाराच्या भुमिकेत,
टी२०मध्ये न्यूझीलंडचा ३-० असा पराभव
वनडेमध्ये वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव
टी२०मध्ये वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव
टी२०मध्ये श्रीलंकेचा ३-० असा पराभव
कसोटीमध्ये श्रीलंकेचा २-० असा पराभव
टी२०मध्ये इंग्लंडचा २-१ असा पराभव
वनडेमध्ये इंग्लंडचा २-१ असा पराभव
टी२०मध्ये वेस्ट इंडिजचा ३-१ असा पराभव*
वेस्ट इंडिज विरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने २० षटकात ५ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. आधी फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली नंतर गोलंदाजांनीही वेस्ट इंडिजला रोखले. वेस्ट इंडिजने १९.१ षटकात सर्वबाद १३२ धावा केल्या. भारताकडून आवेश खान, अक्षर पटेल आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट्स तर अर्शदीप सिंगने १२ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सिक्सर किंग’ रोहितची मोठी उडी, षटकारांच्या विक्रमात पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरला केले ओव्हरटेक
भारतासाठी सोपा नसेल CWGचा अंतिम सामना, ऑस्ट्रेलियाकडून २ वर्षांपूर्वी मिळालेली भळभळती जखम