टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला आहे. उपांत्य सामन्यात भारताला गुरुवारी (10 नोव्हेंबर) इंग्लंडसोबत खेळायचे आहे. या महत्वाच्या लढतीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर मोकळेपणाने उत्तरे दिली. मंगळवारी (8 नोव्हेंबर) रोहितला सराव करताना दुखापत झाली होती. रोहितच्या या दुखापतीनंतर तो उपांत्य सामन्यात केळणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. आता त्याने स्वतः चाहत्यांच्या या शंकेचे निरसन केले आहे.
टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) चा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबर, भारत आणि इंग्लंड यांच्यात 10 नोव्हेंबर रोजी दुसरा उपांत्य सामना खेळला जाईल. रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धच्या लढतीपूर्वी एडिलेड ओव्हल मैदानावर सराव करत होता. यावेळी फलंदाजी करताना त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. या दुखपीतनंतर रोहित उपांत्य सामन्यात बहुतेक खेळणार नाही, अशा चर्चा देखील सुरू झाल्या. पण आता त्याने स्वतः याविषयी माहिती देत दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले आहे.
उपांत्य सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना रोहिते स्वतःच्या फिटनेसची अपडेट दिली. सराव सत्रात लागलेल्या चेंडूविषयी तो म्हणाला, “मी आता पूर्णपणे ठीक आहे. नेट्समध्ये सराव करताना चेंडू लागला होता. थोडी सूज होती, पण आता ठीक आहे.” दरम्यान, टी-20 विश्वचषकात रोहितचा वैयक्तिक खेळ अपेक्षेप्रमाणे झाला नाहीये. पण नेतृत्वाच्या बाबतीत मात्र त्याचे अप्रतिम प्रदर्शन सुरूच आहे. त्याने सुपर 12 फेरीत भारताला पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. ग्रुप दोनमछ्ये भारत पहिल्या क्रमांकावर राहत उपांत्य फेरीत दाखल झाला.
माध्यमांशी बोलताना रोहितने इतरही काही महत्वाच्या मुद्यांवर मत मांडले. इंग्लंडचे आव्हान सोपे नसेल, पण भारताने यापूर्वी अनेकदा त्यांना पराभूत केले आहे आणि यावेळी देखील संघाचा असाच प्रयत्न असेल, असे रोहित म्हणाला. तसेच सूर्यकुमारकडे जबाबदारी पेलण्याची क्षमता आहे, असेही रोहितला वाटते. (Rohit Sharma has given an important update on the injury sustained in the practice session)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 क्रमवारीत सूर्या अव्वल स्थानावर कायम! केएल राहुल आणि अर्शदीप सिंगला फायदा, विराट 11व्या स्थानावर
T20 WC Semi-Final: मार्क वूड, डेविड मलान भारताविरुद्ध खेळणारच! खुद्द कॅप्टन बटलरने दिले संकेत