आयपीएल २०२० मध्ये शुक्रवारी(२३ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने आले आहेत. मात्र या सामन्याला मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे मुकणार आहे. त्याच्याऐवजी कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सचे प्रभारी कर्णधारपद सांभाळेल.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी रोहित ऐवजी अंतिम ११ जणांच्या संघात सौरभ तिवारीला संधी दिली आहे. हा एकमेव बदल मुंबईने अंतिम ११ जणांच्या संघात केला आहे.
चेन्नईने अंतिम ११ जणांच्या संघात ३ बदल केले आहेत. त्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यासाठी एन जगदीसन, ऋतुराज गायकवाड आणि इम्रान ताहिरला संधी दिली आहे. ताहिर या आयपीएल हंगामातील हा पहिला सामना खेळेल. तसेच चेन्नईने शेन वॉट्सन, केदार जाधव आणि पियूष चावला यांना संघातून बाहेर केले आहे.