गुरुवारी (22 ऑक्टोबर) आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 40 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होईल. दुबईमध्ये रात्री 7.30 वाजता हा सामना होणार आहे. दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
गुणतालिकेत राजस्थान 8 गुणांसह सहाव्या आणि हैदराबाद 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. तथापि लीगमध्ये राजस्थानने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत आणि हैदराबादने 9 सामने खेळले आहेत.
मागील सामन्यात राजस्थानने हैदराबादला केले पराभूत
मागील सामन्यात राजस्थानने हैदराबादला 5 गडी राखून पराभूत केले होते. अष्टपैलू राहुल तेवतिया आणि युवा फलंदाज रियान परागने हैदराबादच्या हातून सामना खेचला.
बटलर-स्मिथ यांनी केल्या सर्वाधिक धावा
राजस्थानकडून अनुभवी फलंदाज जॉस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. बटलरने 9 सामन्यात 262 धावा केल्या आहेत आणि स्मिथने 10 सामन्यात 246 धावा केल्या आहेत. याशिवाय युवा फलंदाज संजू सॅमसनने 10 सामन्यांत 236 धावा केल्या आहेत.
आर्चर-तेवतियाने घेतले सर्वाधिक बळी
राजस्थानकडून वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर फिरकीपटू राहुल तेवतियाने सर्वाधिक बळी घेतले आहेत. आर्चरने 10 सामन्यांत 13 गडी बाद केले आहेत तर तेवतियाने 7 बळी घेतले आहेत. आर्चरने हंगामात सर्वाधिक 120 निर्धाव चेंडू टाकले आहेत.
वॉर्नर-बेयरस्टो आहेत हैदराबादचे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर आणि सलामीवीर जॉनी बेयरस्टो यांनी हंगामात आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. वॉर्नरने 9 सामन्यांत 331 आणि बेअरस्टोने 9 सामन्यांत 316 धावा केल्या आहेत. यानंतर 9 सामन्यांत 212 धावा करणाऱ्या मनीष पांडेचा क्रमांक येतो.
रशिद-नटराजन करत आहेत उत्कृष्ट गोलंदाजी
हैदराबादकडून फिरकीपटू राशिद खान आणि मध्यमगती गोलंदाज टी नटराजन यांनी या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. रशीदने 10 सामन्यांत 13 तर नटराजनने 9 सामन्यांत 11 गडी बाद केले आहेत. हंगामात निर्धाव चेंडू फेकण्याचा बाबतीत राशिद (94) सहाव्या क्रमांकावर आहे.
खेळपट्टीबद्दल माहिती आणि हवामान अहवाल
दुबईतील सामन्यादरम्यान आकाश स्वच्छ होईल. तापमान 22 ते 36 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहील. येथील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथील खेळपट्टी संथ गतीची असल्याने फिरकीपटूंना मदत होईल. दुबईमध्ये नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजीला प्राधान्य देईल. दुबईमध्ये आयपीएलपूर्वी झालेल्या 61 टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय मिळवण्याचा दर 55.74% आहे.
या मैदानावर झालेले एकूण टी20 सामने : 61
प्रथम फलंदाजी करताना मिळालेले विजय : 34
प्रथम गोलंदाजी करताना मिळालेले विजय : 26
पहिल्या डावात सरासरी धावसंख्या: 144
दुसर्या डावात सरासरी धावसंख्या: 122
हैदराबादचा विजय मिळवण्याचा दर राजस्थानपेक्षा आहे अधिक
लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादचा विजय मिळवण्याचा दर 52.56% आहे. हैदराबादने आतापर्यंत एकूण 117 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 61 सामने जिंकले आहेत आणि 56 गमावले आहेत. राजस्थानमध्ये विजय मिळवण्याचा दर 50.64% आहे. राजस्थानने आतापर्यंत एकूण 157 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी 79 जिंकले आहेत आणि 76 गमावले आहेत. 2 सामने अनिर्णित होते.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ एक-दोन नाही तर चक्क चार षटकं निर्धाव टाकत बेंगलोरने केला अनोखा पराक्रम
Video : आयपीएलमधून बाहेर पडलेल्या ड्वेन ब्राव्होचा चेन्नईच्या चाहत्यांसाठी भावूक संदेश, म्हणाला…
आरसीबीच्या भेदक गोलंदाजीपुढे केकेआरच्या फलंदाजांची शरणागती; गुणतालिकेत थेट दुसऱ्यास्थानी
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज