भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज एस श्रीसंतने आपल्या सार्वकालिन वनडे संघाची निवड केली आहे. या संघात त्याने पाच भारतीय खेळाडूना स्थान दिले आहे. पण ते सर्व खेळाडू फलंदाज आहेत. श्रीसंतने त्याच्या संघात एकाही भारतीय गोलंदाजाला स्थान दिले नाही.
सलामीवीर फलंदाज म्हणून श्रीसंतने भारतीय संघाची सर्वात यशस्वी जोडी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना स्थान दिले आहे. तीन नंबरला वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा (Brian Lara), तर चार नंबरला भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जागा दिली आहे.
पाचव्या नंबरला त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलिअर्स (AB De Villiers) तर यष्टीरक्षक म्हणून एमएस धोनीला (MS Dhoni) संघात स्थान दिले आहे. श्रीसंतने त्याच्या संघात अष्टपैलू युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि जॅक कॅलिस (Jacques Kallis), तर शेन वॉर्न (Shane Warne) या एका फिरकीपटूला त्याने संघात स्थान दिले आहे. त्याने ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) आणि एलन डोनाल्ड (Allan Donald) यांना जलदगती गोलंदाज म्हणून संघात स्थान दिले आहे.
तर सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीसंतने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांसारख्या दिग्गज खेळाडूंना संघात स्थान दिले नाही, तर त्याने धोनी ऐवजी सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. सर्वांना चकित करत त्याने बारावा खेळाडू म्हणून स्वत: ला संघात ठेवले आहे.
श्रीसंतने भारतासाठी आजपर्यंत २७ कसोटी, ५३ वनडे आणि १० टी२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर १५० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विकेट्सही आहेत. या व्यतिरिक्त तो २००७च्या आंतराष्ट्रीय टी२० आणि २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय संघांचा सदस्य होता.
असा आहे श्रीसंतने निवडलेला सार्वकालिन वनडे संघ-
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, ब्रायन लारा, विराट कोहली, एबी डिविलियर्स, युवराज सिंह, एमएस धोनी (यष्टीरक्षक), जॅक कॅलिस, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, एॅलन डोनाल्ड आणि एस श्रीसंत (संघातील १२वा खेळाडू).
ट्रेंडिंग घडामोडी-
-फक्त १ सामना नीट खेळले नाही आणि आयपीएलचे कायमचे उपविजेते झालेले ५ संघ
-ज्या सामन्यात विकेटकीपर होते, त्याच सामन्यात विकेट्स घेणारे ३ खेळाडू
-कारकिर्दीतील पहिलाच टी२० सामना गाजवणारे ३ फलंदाज, एक आहे माजी कर्णधार