इंग्लंडचा युवा अष्टपैलू सॅम करन यावर्षी आयपीएलचा भाग नाही. त्याला आयपीएल २०२२ मध्ये सहभाग नोंदवायचा होता. परंतु, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल स्टाफने या खेळाडूला आयपीएलपासून दूर राहण्यास सांगितले. तो सध्या आपल्या कंबरेच्या खालच्या भागाच्या दूखापतीचे उपचार घेत आहे. त्याने आयपीएल लिलावात देखील सहभाग नोंदवला नव्हता. आता आयपीएल काळात घरी राहून तो निराश झाला असल्याच त्याने सांगितले आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनच्या मते, या लीगमध्ये पुनरागमन करुन घाई झाली असती. कारण, तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात गंभीर दूखापतीतून बरा होत आहे. गेली २ वर्षे सीएसके संघासोबत खेळलेला सॅम करन म्हणाला, ‘मी निराश आहे की, मी आयपीएल खेळत नाही. घरी राहून आयपीएल पाहणे निराशाजनक आहे.’
तो म्हणाला, ‘मला आयपीएल लिलावात सहभागी व्हायचे होते, परंतु, शेवटी मी असे केले नाही, जो कदाचीत उत्तम निर्णय होता. जर मी आयपीएल खेळण्याचा निर्णय घेतला असता, तर तो खूप घाई झाली असती.’ सॅम करनला २०२१ च्या आयपीएल हंगामाच्या दूसऱ्या सत्रात पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रेक्चर झाले होते. तेव्हापासून तो बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे.
करन म्हणाला, “मला निश्चितपणे आयपीएलमध्ये पुनरागमन करायचे आहे, कारण या लीगमध्ये तुम्ही टी२० क्रिकेटबद्दल खूप काही शिकता. ही एक अशी स्पर्धा आहे, जेथे तूम्ही फक्त क्रिकेटबद्दल बोलता आणि शिकता. तूम्ही जेव्हा सकाळी नाश्त्याला जाता तेव्हा सुपरस्टारसोबत बसलेले असता आणि खेळाबद्दल त्यांच्याशी चर्चा करत असता.”
करनने आयपीएलमध्ये २०१९ मध्ये पदार्पण करत ३२ सामन्यांत १४९.७८ च्या सरासरीने ३३७ धावा केल्या आहेत, यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे, तसेच त्याने गोलंदाजीत ३२ सामन्यांत ३२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे सध्या लक्ष्य जूनमध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीवर असणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी संघात आपले स्थान मिळवण्याकडे त्याचे लक्ष्य असणार आहे.
महास्पोर्टसचा वाॅट्सअॅप ग्रुप जाॅईन करण्यासाठी या लिंकवर क्लीक करा.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: लखनऊच्या बदोनीने चेन्नईच्या चाहतीचं फोडलं डोकं, जोरदार सिक्सरचा चेंडू आदळला मस्तकावर
लखनऊचे ‘नवाब’ ठरले चेन्नईच्या ‘किंग्स’ला भारी! ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवले चौथे स्थान
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला