भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला शुक्रवारी (2 डिसेंबर) सुरुवात झाली. पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाकडून शिखर धवन आणि केएल राहुल सलामीला आले होते. धवन लवकर बाद झाल्यावर राहुलने डाव सावरला आणि संघाला मोठी धावसंख्या गाठण्यास मोलाची कामगिरी बजावली.
मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांना केएल राहुलला सलामीला पाठवण्याचा निर्णय योग्य वाटला नाही. त्यानी सलामीवीर म्हणून एका युवा भारतीय फलंदाजाचे नाव सुचवले आहे.
पहिल्या टी20 सामन्यात धवन फ्लॉप
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात धवन 1 धाव काढून माघारी परतला. त्याला वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्रिफळाचित केले. मात्र, त्यानंतरही केएल राहुलने डाव सावरला आणि 40 चेंडूत 51 धावांची शानदार खेळी केली.
मयंक अगरवालने यावे सलामीला
संजय बांगर म्हणाले, “रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे सलामीवीर फलंदाज कोण असेल? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. शिखर हा नेहमी सलामीला फलंदाजी करतो. त्यामुळे मला असं वाटतं की, रोहितच्या अनुपस्थितीत मयंक अगरवालने शिखर धवनसह सलामीला यावे.”
राहुल पाचव्या क्रमांकावर यशस्वी
“अलीकडच्या काळात केएल राहुलने पाचव्या क्रमांकावर खेळतांना उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्यामुळे धवनसह मयंक अगरवालने सलामीला यावे, असा माझा विश्वास आहे,” असेही पुढे बोलताना बांगर म्हणाले.
आयपीएल 2020 मध्ये राहुलने केल्या सर्वाधिक धावा
केएल राहुलने इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना मयंक अगरवालसह डावाची सुरुवात केली होती. त्याने या हंगामात सर्वाधिक 570 धावा केल्या होत्या.त्यामुळे तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट ऐवजी रोहित शर्माला टी२० संघाचे कर्णधारपद देण्याची गरज नाही, भारतीय दिग्गजाचे मत
…. म्हणूनच जसप्रीत बुमराह यशस्वी गोलंदाज, ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने उधळली स्तुतीसुमने
पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, ‘हा’ खेळाडू ठरला सामनावीर
ट्रेंडिंग लेख –
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर