मागच्या काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात सरफराज खान याची निवड झाली नाही. संघ व्यवस्थापनाने सरफराजला पुन्हा एकदा डावलल्यामुळे त्यांच्यासह निवडकर्त्यांवर चांगलीच टिका झाली. माजी दिग्गज सुनील गावसकर आणि वसीम जाफर यांनीदेखील निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. असे असले तरी, ताज्या आकड्यांवरून सरफराजला संघात न घेण्याचा निर्णय योग्य असल्याचेच दिसते.
सरफराज खान (Sarfaraz Khan) मागच्या काही वर्षांमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेत राहणारे नाव बनला आहे. त्याने मागच्या दोन-तीन रणजीहंगामांमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले असून शतकांची रांग लावली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीत सरफराज पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. दुलीप ट्रॉफी 2023मध्ये सरफराज मागच्या तीन डावांमध्ये फक्त 6 धावा करू शकला आहे. दोन वेळा त्याने शुन्यावर विकेट गमावली, तर एकदा 6 धावा करू शकला. वेस्ट झोन संघासाठी खेळणाऱ्या सरफराजने आपल्या संघाची देखील चांगलीच निराशा केली आहे.
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात वेस्ट झोन आणि साउथ झोन आमने सामने आहेत. या सामन्यातील पहिल्या डावात सरफराज शुन्यावर बाद झाला आहे. पण दुसऱ्या डावात त्याच्याकडे पुनरागमनाची संधी असेल. संघासाठी त्याची खेली निर्णायक ठरू शकते. अंतिम सामन्यातील पहिल्या डावात साऊथ झोनने प्रथम फलंदाजी करत 213 धावा केल्या आहेत. वेस्ट झोन संघाने आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाखेर 7 बाद 129 धावा केल्या असून संघ 84 धावांनी मागे आहे.
दरम्यान, सरफराजचे मागच्या रणजी हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर ते खूपच जबरदस्त राहिले होते. रणजी ट्रॉपी 2023मध्ये त्याने मुंबई संघासाठी 9 सामन्यांमध्ये 556 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 92.66 होती, तर स्ट्राईक रेट 72.49 चा राहिला होता. हंगामात त्याने तीन शतक देखील केली होती. पण या अप्रतिम प्रदर्शनानंतरही त्याला भारतीय संघाकडून पदार्पणाची संधी मिळाली नाही. (Sarfraz Kahn’s flop show at Duleep Trophy 2023)
महत्वाच्या बातम्या –
आशियाई ऍथलेटिक्स: अभिषेकने उघडले भारताच्या पदकांचे खाते! बँकॉकमध्ये फडकला तिरंगा
किशनला संधी देताच दिग्गजाने मुरडले नाक, म्हणाला, “आता भारतीय संघ पुढे…”