भारताचा श्रीलंका दौरा नुकताच संपला आहे. भारतीय क्रिकेटपटू आता सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत आहेत. दरम्यान आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी फिरकीपटू शाहबाज अहमद गुपचूप विवाहबंधनात अडकला आहे. शाहबाजने डॉक्टर शाइस्ता अमीन नावाच्या काश्मिरी मुलीशी लग्न केले आहे. अमीनसोबत लग्न करून शाहबाजने आयुष्याचा नवा प्रवास सुरू केला आहे.
शाहबाजने आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. 29 वर्षीय शाहबाज अहमदने काश्मीरच्या मूळ रहिवासी असलेल्या डॉक्टर शाइस्ता अमीनशी लग्न केले. काश्मीरमधील परंपरेनुसार कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. याशिवाय वधूचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र या सोहळ्यात सहभागी झाले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, शाहबाज 10 ऑगस्ट रोजी हरियाणामधील त्याच्या गावी भव्य रिसेप्शन आयोजित करण्याची शक्यता आहे.
शाहबाजच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तो हातात बॅट घेऊन दिसत आहे. त्याने लग्नात पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. शाहबाजसोबत आणखी दोन लोकही फोटोत दिसत आहेत. उल्लेखनीय म्हणजे शाहबाज हा मूळचा हरियाणाचा आहे. कोविड महामारीच्या काळात त्याने बंगालमधून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. यानंतर त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि क्रिकेटच्या जगात नाव कमावले.
Star Indian Cricketer Shahbaz Ahmed marries a Shopian girl Dr Shaista Amin. pic.twitter.com/1FFS5CQXpV
— Malik Mudasir (@MalikMu25141247) August 8, 2024
दरम्यान भारतीय संघाचा आश्वासक अष्टपैलू शाहबाज अहमद आयपीएलमधील लोकप्रिय फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना प्रसिद्धीझोतात आला. मात्र, अहमदला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले आहे. आयपीएल 2024 मध्ये जेव्हा शाहबाजला संधी मिळाली तेव्हा त्याने बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली कामगिरी केली. आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे शाहबाज अहमदने 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले आहे.
ऑक्टोबर 2022 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने वनडे पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने भारताकडून 3 वनडे सामने खेळले असून त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर ऑक्टोबर 2023 मध्ये त्याने टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. बांगलादेशविरुद्ध त्याने पदार्पणाचा टी20 सामना खेळला होता. त्यानंतर तो फक्त 2 टी20 सामन्यात खेळताना दिसला, ज्यात त्याने 2 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी अपडेट! ऑस्ट्रेलियात दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया करणार विशेष सराव
विनेशसाठी धावून आला सचिन तेंडूलकर; गणित समजावत म्हणाला, “तिला रौप्य पदक…”
नीरज चोप्राच्या आईनं केलेल्या वक्तव्यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया भावूक! म्हणाला…