क्रिकेटविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. क्रिकेट सामना खेळताना गुजरातच्या एका खेळाडूचे निधन झाले आहे. या बातमीने क्रिकेटविश्वात खळबळ माजली आहे. मागील काही दिवसांपूर्वीही क्रिकेट खेळतानाच युवा खेळाडूंचे निधन झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. निधन झालेला मुलगा इंजीनिअरिंगचे शिक्षण घेत होता. अशात त्याच्या निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
गुजरातमधील घटना
गुजरातच्या अरावली येथून मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने निधन होण्याच्या वाढत्या घटनांमध्ये कमी वयातील मुलं जीव गमावत आहेत. ही घटनादेखील अशीच आहे. अरावली येथील 20 वर्षांच्या तरुण मुलाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या खेळाडूचे नाव पर्व सोनी सांगितले जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, अरावलीच्या मोडासा येथील दीप भागात असणाऱ्या गोवर्धन सोसायटीच्या तीर्थ अपार्टमध्ये एक कुटुंब राहते. याच कुटुंबातील 20 वर्षीय पर्व सोनी क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने खाली कोसळला आणि तिथेच त्याचे निधन झाले. तो इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. त्याच्या निधनाने कुटुंब तुटले आहे. कुटुंबातील व्यक्तींचे हंबरडा फोडत आहेत.
जीएसटी कर्मचाऱ्यानेही क्रिकेट खेळताना गमावलेला जीव
यापूर्वी गुजरातच्या अहमदाबाद येथे एका क्रिकेट सामन्यादरम्यान जीएसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. हा सामना जीएसटी कर्मचारी आणि जिल्हा पंचायतच्या कर्मचाऱ्यांमध्ये खेळला जात होता. यावेळी गोलंदाजी करत असताना जीएसटी कर्मचाऱ्याची तब्येत अचानक बिघडली आणि तो जमिनीवर कोसळला. माध्यमांतील वृत्तांनुसार, गुजरातमध्ये एक महिन्यात 7 लोकांनी हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमावला आहे. (shocking 20 years old Cricketer Died due to heart attack During Match)
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेश पुढे अफगाणिस्तानचे लोटांगण! सलग दुसऱ्या विजयासह केली टी20 मालिका नावे
“तो जॉन्सन आणि ब्रेट लीचे कॉम्बिनेशन”, वूडच्या गोलंदाजीने वेडावला ऑसी दिग्गज