विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (21 ऑक्टोबर) श्रीलंकन संघाला अखेर पहिला विजय मिळाला. नेदरलँड्सविरुद्धच्या या सामन्यात श्रीलंकेने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. सदीरा समरविक्रमा याने या विजयासाठी सर्वाधिक 91* धावांचे योगदान दिले. तसेच गोलंदाजी विभागातून दिलशान मदुशंका आणि कुसल रजिथा यांनी घेतलेल्या विकेट्स महत्वाच्या ठरल्या.
श्रीलंकेला या सामन्यात विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य त्यांनी 48.2 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. नेदरलँड्ससाठी आर्यन दत्त याने तीन विकेट्स घेत सर्वोत्तम गोलंदाजी केली, पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. दुसरीकडे सदीरा समरविक्रमा (Sadeera Samarawickrama) याने 107 चेंडूत 91* धावांची सर्वोत्तम खेळी करत श्रीलंकेला विश्वचषकातील पहिला विजय मिळवून दिला. नेदरलँड्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. (Sri Lanka finally won his first game in wc2023! Beating the Netherlands deepened the points account)
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
नेदरलँड्स – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीडे, सीब्रँड एंजेलब्रेच, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
श्रीलंका – पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका
महत्वाच्या बातम्या –
वानखेडेवर क्लासेन-जेन्सनचे वादळ! दक्षिण आफ्रिकेचे इंग्लंडसमोर 400 धावांचे आव्हान
इतिहास घडला! आख्खा संघ 29 धावांवर All Out, एकाही फलंदाजाने केली नाही 10 Run करण्याची डेरिंग