श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात झालेला पहिला टी२० सामना अतिशय रोमांचक राहिला. कोलंबोच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेला ३८ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन या सामन्यात केवळ २७ धावा करू शकला. परंतु त्याच्यासोबत सामन्यादरम्यान असा काही प्रसंग घडला, जो सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.
भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना पावरप्लेमध्ये श्रीलंकेचा संघ अधिकाधिक विकेट्स घेण्याच्या प्रयत्नात होता. पहिल्याच चेंडूवर सलामीवीर पृथ्वी शॉची विकेट मिळाल्यांने त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. पण पुढे मात्र त्यांना विकेटसाठी थोडा संघर्ष करावा लागला. अशात पाचव्या षटकातील इसूरु उडाणाच्या दुसऱ्या चेंडूवर संजूने आऊटसाइड ऑफला खराब फटका मारला. यावर क्षेत्ररक्षण करत असलेला अविष्का फर्नांडो झेल टिपण्यासाठी पुढे धावला आणि त्याने झेलही पकडला.
Avishka Fernando was very very excited with that catch.
Turns out that the ball bounced before.
LIVE COMMS:
👉 https://t.co/mn58zBrLmI 👈 #SLvIND | #INDvSL | #INDvsSL pic.twitter.com/Bihn1EbQze— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) July 25, 2021
यानंतर संघ सहकाऱ्यांसोबत मिळून तो झेलचा जल्लोषही साजरा करू लागला. मात्र सॉफ्ट सिग्नलमध्ये याउलट चित्र दिसून आले. मुळात विकेटच्या आनंदात सेलिब्रेशन करत असलेल्या फर्नांडोने झेल टिपण्यापुर्वी चेंडूने मैदानावर टप्पा घेतला होता आणि त्यानंतर त्याच्या हाती चेंडू आला होता. त्यामुळे पंचांनी संजू नाबाद असल्याचे घोषित केले. या षटकात संजूला जास्त धावा करता आल्या नाहीत.
Sanju Samson does a ‘Dancing Rose’ in the last over of the Powerplay! 🔥
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 1 (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/QYC4z57UgI) now! 📺#SLvINDOnlyOnSonyTen #HungerToWin #SanjuSamson pic.twitter.com/d1g8MkWIWD
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 25, 2021
परंतु पुढील सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने अगदी हलक्या हाताने षटकार खेचला. धनंजय डी सिल्वाच्या गोलंदाजीवर त्याने हा खणखणीत षटकार मारला होता. संजूने जणू मागील षटकात आपल्याला बाद केल्याच्या आनंदात जल्लोष केलेल्या श्रीलंका संघाला या षटकाराद्वारे सणसणीत चपराक मारली होती. अखेर वानेंदु हसरंगाने ६.१ षटकात त्याला पायचित केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विकेट मिळताच गोलंदाजाची कॉमेंट्री बॉक्समध्ये धाव, हुंकार भरत केलं हटके सेलिब्रेशन; बघा व्हिडिओ
शांत स्वभावाचा द्रविडही भारतीय संघातील ‘त्या’ खेळाडूचा चुकिचा फटका पाहून असा वैतागला
SLvIND: त्यांनी माझ्या डोक्यावरचा भार हलका केला; कर्णधार धवनने ‘या’ २ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय