आज सुरेश रैना व रोहित शर्माने इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन घेतला. यात त्यांनी फिटनेस, कामगिरीतील सुधारणा किंवा तांत्रिक गोष्टींवर चर्चा केली.
यावेळी युवराज सिंग व युझवेंद्र चहल हे दोघे कमेंट करत रैना व रोहितची मजा घेत होते. त्यात एक कमेंट चहलने केली होती. ज्यामध्ये त्याने रोहित व रैनाकडे अरेंज मॅरेजबद्दल मार्गदर्शन करण्याची मागणी केली.
यावर युवराजने चहलला कमेंटमध्येच असे लग्न न करण्याचा सल्ला दिला. “चहल तु असं करु नकोस. तु रैना व रोहितचे गाल पाहिलेस का? त्यांची रोज अरेंज मॅरेज केल्यामुळे बायकोकडून पीटाई होते,” असे युवराजने त्याला सांगितले.
यावेळी सतत कमेंट करणाऱ्या चहलला रोहितने ‘तो वेडा झाला आहे’ असेही म्हटले.