भारतीय क्रिकेट संघाचा (team india) मध्यक्रमातील फलंदाज सूर्युकमार यादव (suryakumar yadav) याला वाहनांची खूप आवड आहे. त्याच्याकडे गाड्यांचे मोठे कलेक्शनही आहे. आता त्याच्या ताफ्यात एका नवीन गाडीची भर पडली आहे. सूर्युकमारने एक मोठी आणि शक्तीशाली गाडी खरेदी केली आहे. या गाडीचे नाव निसान ‘जोंगा’ असे आहे. स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्रमा खात्यावरून त्याने ही माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवली.
मुबई इंडियन्सचा महत्वाचा फलंदाज सूर्यकुमारने शनिवारी (२९ जानेवारी) स्वतःच्या सोशल मीडियावर त्याच्या गाडीचा फोटो शेअर केला आहे. त्याने खेरदी केलेल्या या जोंगाचा एक खास इतिहास आहे. निसान कंपनीने तयार केलली ही गाडी भारतीय सैन्यात वापरली गेली आहे. मोठ्या काळापर्यंत सैन्याने या गाडीचा वापर केला आहे. मात्र, आता मात्र त्याचा वापर बंद झाला आहे. सूर्यकुमारने ही गाडी घेणारा एकटाच भारतीय क्रिकेटपटू नाहीय. त्याच्या आधी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीनेही अशीच गाडी खरेदी केली होती. धोनीला अनेकदा त्याच्या जोंगामधून रांचीमध्ये फिरताना पाहिले गेले आहे.
https://www.instagram.com/p/CZUrRZbPCGj/?utm_medium=copy_link
सूर्यकुमारने त्याच्या या जोंगा गाडीला ‘हल्क’ असे नाव दिले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘माझे नवीन खेळने हल्कला हॅलो म्हणा.’ दरम्यान, दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार खेळला होता. मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली होती. त्याने या सामन्यात ३२ चेंडू खेळले आणि ३९ धावा केल्या होत्या.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यादरम्यान फेब्रुवारीत होणाऱ्या टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठीही सूर्यकुमारला संघात निवडले गेले आहे. त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याचीही अपेक्षा आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील सामने ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळले जातील. तर टी२० मालिकेतील सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारीला कोलकातामध्ये खेळले जातील.
महत्वाच्या बातम्या –
‘कर्णधार’ रोहित भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेईल; विराटच्या बालपणीच्या प्रशिक्षकाने गायले गुणगान
…अन् गोलंदाजाला चक्क संघनायकापुढे जोडावे लागले हात, व्हिडिओ पाहून जाणून घ्या प्रकरण
शाहरुखसह तमिळनाडूच्या ‘या’ खेळाडूची लागली लॉटरी, वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियात मिळाली जागा
व्हिडिओ पाहा –