भारतात सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेचा थरार चालू आहे. नुकत्याच पार पडलेल्या उपांत्य फेरी सामन्यात तमिळनाडूने ७ विकेट्सने राजस्थानवर मात करत अंतिम सामना गाठला. तर बडोदाने २५ धावांनी पंजाबला पराभवाची धूळ चारत अंतिम फेरीत धडक मारली. आज (३१ जानेवारी) हे दोन्ही संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी अखेरची झुंज देणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
जर बडोदा संघाने अंतिम सामन्यात विजयी पताका झळकावली तर तिसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर त्यांचे नाव कोरले जाईल. याउलट तमिळनाडू संघाने अंतिम सामना जिंकल्यास विजेता ठरण्याची ही त्यांची दुसरी वेळ असेल.
दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखालील तमिळनाडू संघात युवा आणि अनुभी खेळाडूंचे मिश्रण आहे. साखळी फेरी सामन्यात या संघाने मोठ्या फरकाने काही सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या बाजूला केदार देवधर याच्या नेतृत्त्वाखालील बडोदा संघानेही साखळी फेरीतील काही सामन्यात एकहाती विजय मिळवला आहे.
विशेष म्हणजे, बडोदा संघाचा सलामीवीर फलंदाज दिपक हुड्डा कर्णधार कृणाल पंड्यासोबत झालेल्या मतभेदांमुळे स्पर्धा सोडून निघून गेला. त्यानंतर कृणालच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यालाही स्पर्धा अर्ध्यातच सोडावी लागली. तरीही बडोदा संघाच्या खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला. त्यामुळे जेतेपद जिंकण्यासाठी या दोन्ही संघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.
असा असेल तमिळनाडू संघ
हरी निशांत, एन जगदीशन, बाबा अपराजित, अरुण कार्तिक, सोनू यादव, दिनेश कार्तिक (कर्णधार), शाहरुख खान, रविश्रीनिवासन साई किशोर, एम मोहम्मद, मुर्गन अश्विन, अश्विन क्रिस्ट
असा असेल बडोदा संघ
केदार देवधर (कर्णधार), स्मिथ पटेल, विष्णु सोळंकी, अभिमन्या राजपूत, निनाद राथ्वा, अतित शेठ, भानू पनिया, बाबाशफी पठान, लुक्रम मेरीवाला, भार्गव भट्ट, कार्तिक काकडे.
महत्त्वाच्या बातम्या-
कहर! धोनीने बाकावर बसवून ठेवलेल्या फलंदाजाने दाखवला दम, अवघ्या ७ सामन्यात चोपल्या ३५० धावा
देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणार्या प्रियांकला आता तरी संधी मिळणार का?