सध्या मोहम्मद शमी बंगालकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे. शमीच्या दुखापतीची बातमी काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेदरम्यान समोर आली होती. अशा परिस्थितीत शमीला दुखापत होणे ही खरोखरच टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान आता मोहम्मद शमीला पाठीचा त्रास झाला आहे.
काल (29 नोव्होंबर) शुक्रवारी निरंजन शाह स्टेडियमवर मध्य प्रदेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगालचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पाठीचा त्रास झाला. डावातील शेवटचे षटक टाकत असताना शमीने चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला आणि तो पडला. पडल्यानंतर शमी अस्वस्थ दिसला आणि त्याने त्याची पाठ धरली. यानंतर शमीची मैदानावर तपासणी करण्यात आली. मात्र शमीने उठून आपले ओव्हर पूर्ण केले.
स्पोर्टस्टारच्या अहवालानुसार, शमीला फक्त एक सौम्य दुखापत झाली आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची गंभीर समस्या नाही. रविवारी मेघालय विरुद्धच्या सामन्यात तो दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शमीने टीम इंडियासाठी 2023 एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये शेवटचा सामना खेळला होता. यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे तो सुमारे एक वर्ष क्रिकेटपासून दूर राहिला. शमीने 2024 रणजी ट्रॉफीद्वारे पुनरागमन केले. तो आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत आहे.
Mohammed Shami had an injury scare during the #SyedMushtaqAliTrophy.
There was a bit of panic in the Bengal camp when Shami lay on the ground holding his lower back. However, he stood up after brief treatment to complete the over without further trouble.
MP went on to win the… pic.twitter.com/ou6MUtj9wH
— Sportstar (@sportstarweb) November 29, 2024
मोहम्मद शमीने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये आतापर्यंत 64 कसोटी, 101 वनडे आणि 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यात त्याने कसोटीच्या 122 डावात 229 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांच्या 100 डावांमध्ये 195 विकेट्स आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 23 डावांमध्ये 24 बळी घेतले आहेत.
हेही वाचा-
आयसीसीचा पाकिस्तानला अल्टिमेटम! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारा, नाहीतर….
IND vs AUS: संघाला मोठा धक्का! दुसऱ्या कसोटी सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर
दिल्ली संघाने टी20 मध्ये रचला इतिहास! एका सामन्यात सर्वच खेळाडूंनी केली गोलंदाजी