टी नटराजनने इनडोअर अकादमीमध्ये सराव सुरू करून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. नटराजनला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली असून आयपीएल 2021 मधील काही सामने खेळून त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती.
पण आता सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज नटराजनने चाहत्यांना जोरदार पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये त्याच्या तयारीची माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, इनडोअर अकादमीमध्ये नटराजन पूर्ण जोर लावून गोलंदाजीचा सराव करत आहे.
त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘तुमचे स्वतःचे नशीब बनवा,’ असे लिहिले आहे. (create your own destiny #coming back stronger than ever)
T Natarajan has started bowling in the Nets. pic.twitter.com/FoTFwf1LI9
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 5, 2021
T Natarajan trains in indoor nets after recovering from injury#Natarajan #ENGvIND #IPL2021 #SunrisersHyderabad #IndvsEng#INDvENG #ENGvsIND pic.twitter.com/WTaKuqQ1zA
— Cricket Mirror (@cricket_mirror7) August 5, 2021
यॉर्कर किंग नटराजनच्या गुडघ्यावर एप्रिल महिन्यात शस्त्रक्रिया झाली होती. सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएल 2021 मध्ये नटराजनची कमतरता जाणवली. कारण तो अंतिम षटकांमध्ये संघासाठी फायदेशीर गोलंदाजी करायचा. भुवनेश्वर कुमारनेही शारीरिक वेदनांमुळे काही सामन्यातून माघार घेतली होती. या दोन गोलंदाजांच्या कमतरतेमुळे संघाला मोठा फटका बसला होता. संघाची गोलंदाजी तुलनेने कमकुवत दिसली होती.
टी नटराजनला संघात स्थान मिळणे कठीण- एमएसके प्रसाद
नुकतेच एका मुलाखतीत माजी राष्ट्रीय निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी एका मुलाखतीत सांगितले, “शक्यतो आगामी टी-20 विश्वचषकाच्या भारतीय संघात नटराजला संधी मिळणार नाही. आपल्याकडे आधीच पुरेसे वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे त्याला संधी मिळेल यावर मला शंका वाटते. बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज चांगली खेळी करत आहेत. हार्दिक पांड्याही गोलंदाजीस सज्ज झाला आहे. त्यामुळे त्याला संघात जागा मिळणे कठीण आहे.”
प्रसाद पुढे म्हणाले, “पण मला नटराजनसाठी वाईट वाटत आहे. त्याने हळूहळू अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्वतःचे स्थान तयार केले होते. त्याला खूप चुकीच्या वेळी दुखापत झाली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
पत्रकाराच्या लांबलचक प्रश्नावर वैतागलेल्या कोहलीची तिखट प्रतिक्रिया; नेटकरी म्हणाले, ‘घनघोर अपमान’
ऑस्ट्रेलियाचे पुन्हा लोटांगण, बांगलादेशने जिंकला सलग तिसरा टी२० सामना; रिकॉर्ड बुकमध्ये मिळवली जागा
‘ट्विटर डर गया’! ब्लू टीक परत येताच फॉर्ममध्ये आले धोनीचे चाहते, कमेंट्सचा पाडला पाऊस