कबड्डीची जर्सी उतरवुन पोलीसांच्या जर्सीत हा कबड्डीपटू करतोय लोकांची मदत

कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वकाही लाॅकडाऊन झालं आहे. सर्वच जण घरात आहेत. मोठे मोठे खेळाडु घरातच असताना पद्मश्री विजेता कबड्डीपटू रस्तावर उतरून आपली ड्युटी करत आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत लोकांची मदत करत आहे.

तो पद्मश्री पुरस्कार विजेता कबड्डीपटू म्हणजे अजय ठाकूर. मागीलवर्षीच पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेता ठरलेला कबड्डीपटू अजय ठाकूर भारत लॉकडाऊन असताना ड्युटीवर आहे. पोलीस विभागात डीएसपी पदावर असलेला अजय ठाकूर हिमाचलप्रदेशमध्ये ड्युटी करत आहे.

Related Posts

द्रविडने श्रेय्यस अय्यर समज दिला, तु नक्की करतोय तरी काय?

“अजून वेळ गेली नाही, घरीच रहा आणि दुसऱ्यांना पण सांगा. प्रशासनास सहकार्य करा, तरच हे शक्य आहे.” असा संदेश अजय ठाकूरने सोसिएल मीडियावर दिला आहे. अजय ठाकूर व्यतिरिक्त पोलीस सेवेत असलेले अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू ड्युटी करत आहेत. त्याचा सर्वांचा सर्व जनतेला एकच संदेश आहे की “घरीच राहा, सुरक्षित राहा”

भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेल्या अजय ठाकूरला मागीलवर्षी पद्मश्री व अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला आहे. दोन्ही पुरस्कार मिळवणारा अजय ठाकूर दुसराच कबड्डीपटू आहे.

View this post on Instagram

Please Stay home save lives

A post shared by AJAY THAKUR (@ajaythakurkabaddi) on

ट्रेंडिंग घडमोडी-

२००७ विश्वचषकाचा हिरो थेट रस्त्यावर उतरुन लोकांना करतोय मदत

या क्रिकेटरने सांगितले, कोरोना व्हायरसमुळे त्याला झालेले फायदे

You might also like