टीम इंडिया जिथं १२ सामने खेळली ते मैदान आता होणार कोरोना बाधितांसाठी आयसोलशन सेंटर

सध्या कोरोना व्हायरसचा धोका भारतातही वाढत आहे. त्यामुळे आता राज्य क्रिकेट संघटनाही त्यांच्या राज्य सरकारच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. नुकतेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले की कोतकाता येथील इडन गार्डन हे कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी उपलब्ध असेल.

त्याचबरोबर हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन देखील तेलंगणा राज्य सरकारच्या मदतीला धावून आले आहे. त्यांनीही राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम एकांतवासाचे सेंटर म्हणून उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवली आहे.

याबद्दल हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव आर विजयानंद यांनी अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीनच्या वतीने तेंलगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी स्टेडियममधील ४० मोठ्या खोल्या एकांतवासासाठी वापरल्या जाऊ शकतात असे म्हटले आहे.

स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्तानुसार या पत्रात विजयानंद यांनी लिहिले आहे की ‘आपली बांधिलकी जोपासून उपाय योजणांची अंमलबजावणी करण्यासाठी मी हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन आणि अपेक्स कौन्सिलच्या वतीने उप्पलमधील राजीव गांधी स्टेडियमवर एकांतवासाचे सेंटर करण्याची आमची तयारी आहे.’

‘संकटाच्या या वेळी आपले नैतिक कर्तव्य म्हणून आम्हाला वाटते की स्टेडियममधील ४० मोठ्या खोल्या आहेत ज्यामध्ये कोरोना व्हायरस ग्रस्त रूग्णांची काळजी घेतली जाऊ शकते. तसेच खूप पार्किंगची जागाही उपलब्ध आहे. जागतिक संकट बनलेल्या व्हायरसविरूद्ध या भीषण लढाईत आम्हीपण वाटा उचलल्याचा आम्हाला आनंद होईल.’

त्याचबरोबर तेंलगणा राज्य कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दलही या पत्रात कौतुक केले आहे.

हैद्राबादमधील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने १२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

ट्रेडिंग घडामोडी – 

कबड्डीची जर्सी उतरवुन पोलीसांच्या जर्सीत हा कबड्डीपटू करतोय लोकांची मदत

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळताना टिच्चून फलंदाजी करणारे ५ फलंदाज

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारे ५ गोलंदाज, पहिल्या स्थानावर आहे एक भारतीय

You might also like