जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धा सध्या सुरु आहे. सोमवारी (२६ जुलै) या स्पर्धेचा चौथा दिवस होता. भारतासाठी मात्र हा दिवस फारसा यशस्वी ठरला नाही. अनेक स्टार खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. असे असले तरी अजून अनेक स्पर्धा बाकी असल्याने भारताला पदकांची आशा आहे. आत्तापर्यंत भारताच्या खात्यात १ रौप्यपदक आहे. आता पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा चाहत्यांना आहेत. भारताचे पाचव्या दिवसाचे वेळापत्रक कसे असेल, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
२७ जुलै वेळापत्रक (वेळ – भारतीय प्रमाणवेळेनुसार)
१. नेमबाजी –
– १० मीटर एअर पिस्तुल मिश्र संघ क्वालिफिकेशन स्टेज-१, वेळ – पहाटे ५.३० वाजता, (खेळाडू – सौरव चौधरी आणि मनू भाकर, यशस्विनी देसवाल आणि अभिषेक वर्मा)
– १० मीटर एअर रायफल मिश्र संघ क्वालिफिकेशन स्टेज-१, वेळ – सकाळी ९.४५ वाजता, (खेळाडू – इलावेनिल वालारिवन आणि दिव्यांश सिंग पंवार, अंजुम मुद्गिल आणि दीपक कुमार)
– १० मीटर एअर रायफल मिश्र संघ मेडल राऊंड, वेळ – सकाळी ११.४५ वाजता, खेळाडू – पात्रतेवर अवलंबून
२. टेबल टेनिस –
पुरुष एकेरी तिसरी फेरी, वेळ – सकाळी ८.३० वाजता, (खेळाडू – अचंता शरत कमल (भारत) विरुद्ध मा लोंग (चीन))
३. बॉक्सिंग –
महिला ६९ किलो वजनी गट-राऊंड-१६, वेळ – सकाळी १०.५७ वाजता, (खेळाडू – लवलीना बोरगोहेन विरुद्ध एपेट्ज नेदिन)
४. बॅडमिंटन
पुरुष दुहेरी ग्रुप अ सामना, वेळ सकाळी ८.३० वाजता, (खेळाडू – सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (भारत) विरुद्ध बेन लेन आणि सीन वेंडी (ग्रेट ब्रिटन))
५. हॉकी –
पुरुष पूल अ सामना, वेळ – सकाळी ६.३० वाजता, (संघ – भारत विरुद्ध स्पेन)
६. सेलिंग –
– महिला लेजर रेडियल- रेस ६ आणि ६, वेळ – सकाळी ८.३५ वाजता, (खेळाडू – नेत्रा कुमानन)
– पुरुष लेजर- रेस ४,५ आणि ६, वेळ – सकाळी ८.४५ वाजता, (खेळाडू – विष्णून सरवनन)
– पुरुष स्किफ ४९ईआर – रेस १,२ आणि ३, वेळ – सकाळी ११.२० वाजता, (खेळाडू – केसी गणपति आणि वरूण ठक्कर)
महत्त्वाच्या बातम्या –
टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू परतली मायदेशी; दिल्लीत पोहचताच झाले जंगी स्वागत
मणिपूर सरकारने मिराबाई चानूला देऊ केली पोलिस खात्यात नोकरी, दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण पद
रिषभचा इंग्लंडमधील नवा मित्र पाहिला का? स्वतः शेअर केला व्हिडिओ