भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) खेळण्यास सुरुवात करणार आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या गतीसह उसळणाऱ्या चेंडूंसाठी अनुकूल असतात. त्यामुळे आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना टिकून रहायचे आव्हान आहे.
मागील काही वर्षात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा ताफा बदलला आहे. मोर्ने मॉर्कल, व्हर्नोन फिलँडर, डेल स्टेन यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर नवीन गोलंदाज संघात आले आहेत. त्यामुळे आता भारतीय फलंदाजांसमोर त्यांचं आव्हान आहे.
याआधी आफ्रिका दौऱ्यावर सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी आपल्या फलंदाजीत चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्याकाळी तर आफ्रिकाकडून ऍलन डोनाल्ड, शॉन पोलॉक आणि डेल स्टेनसारखे आक्रमक गोलंदाज होते. या जाणून घेऊया ५ भारतीय फलंदाजांच्या दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या खास खेळींबद्दल.
१. कपिल देव (Kapil Dev)
साल १९९२ मध्ये कपिल देव यांनी पोर्ट एलिझाबेथमध्ये अविस्मरणीय खेळी खेळली होती. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आणि २१२ धावा केल्या. तसेच आफ्रिकेने २७५ धावा करून ६३ धावांची आघाडी घेतली. भारत दुसऱ्या डावांत ८८-७ या स्थितीत होता. आणि तेव्हा कपिल देव यांनी त्यांनी १८० चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १२९ धावा केल्या.
कपिल देव व्यतिरिक्त सर्वाधिक धावा १७ होता, ज्या मनोज प्रभाकर, किरण मोरे, अनिल कुंबळे यांनी केल्या होत्या. कपिल देव यांच्या खेळीमुळे भारत २०० धावांचा टप्पा पार करू शकलो. दक्षिण आफ्रिकेने ९ विकेट्सने सहज विजय मिळवला पण कपिल देव यांची ही खेळी भारताच्या सर्वोत्तम ५ खेळींमध्ये समाविष्ट झाली. एवढंच नव्हे तर कपिल देव यांनी दुखापत झालेल्या उजव्या हातासोबत फलंदाजी केली होती.
२. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
केपटाऊनमध्ये २ जानेवारी १९९७ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना खेळवण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेने हा सामना भलेही २८२ धावांनी जिंकला होता, पण सचिनने बराच वेळ तग धरून ठेवला होता. त्याने १६९ धावा केल्या होत्या आणि अजूनही त्या शतकाला आठवणीत ठेवले जाते.
मालिकेचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी घेऊन ५२९ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारताने फक्त ५८ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. नंतरसचिन आणि अझहरुद्दीन यांनी डाव पुढे नेला. अझहरुद्दीन शतक करून बाद झाले आणि परत विकेट्स जायला सुरुवात झाली. तरी सचिनने हार न मानता टिकून राहून शतक पूर्ण केलं. सचिन भारतीय डावात शेवटचा बाद होणारा फलंदाज होता. सचिन भारतासाठी दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा बनवल्या आहेत. त्याने १७२४ धावा बनवल्या आहेत.
३. व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman)
व्हीव्हीएस लक्ष्मणाला संकटातून तारून नेणारा असं म्हणतात. त्याने दुसऱ्या डावात काही चांगल्या खेळ्या करून संघाला मदत केली. २०१० मध्ये डर्बनमध्ये त्याने कठीण परिस्थितीत ९६ धावा केल्या आणि दाखवून दिलं की तो दुसऱ्या डावात कसा खेळू शकतो. डर्बन कसोटीत भारताने ७ विकेट्स १४८ धावांवर गमावल्या होत्या.
यानंतर फलंदाजीला आलेल्या झहीर खानने संघाला २८८ धावांपर्यंत पोहोचवलं होतं. दक्षिण आफ्रिकेला लक्ष्याचा पाठलाग करताना २१५ धावांवरच गारद करून भारताने ८७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
अधिक वाचा – द. आफ्रिकेच्या ताफ्यात पसरलीय ‘या’ भारतीय खेळाडूची भीती, कर्णधारालाही आठवण आहे ३ वर्षांपूर्वीची जखम!
४. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
सध्या जरी चेतेश्वर पुजारा खराब फॉर्ममध्ये असला तरी त्याने आधी काही अविस्मरणीय खेळ्या केल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे २०१३ मध्ये जोहान्सबर्ग मैदानावर खेळलेली खेळी. धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि भारताने २८० धावा केल्या. आणि आफ्रिका २४४ धावांवरच गारद झाली त्यामुळे यजमान ३६ धावांनी पिछाडीवर होते.
दुसऱ्या डावात पुजारा आणि कोहलीने आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या नाकात दम आणला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी केली. पुजाराने २७० चेंडूत २१ चौकार मारत १५३ धावा केल्या. दुदैवाने कोहली ९६ धावांवर बाद झाला आणि सलग दुसरं शतक हुकलं.
भारतीय संघ ४२१ धावांवर सर्वबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेला ४५८ धावांचं लक्ष्य मिळालं. डिविलियर्स आणि डू प्लेसिसने २०५ धावांची भागीदारी करून भारताला चिंतेत टाकलं होतं. पण इशांत शर्माने डीविलियर्सला बाद केलं. पण फिलँडर आणि स्टेन यांनी फलंदाजी करून सामना अनिर्णित ठेवला.
५. विराट कोहली (Virat Kohli)
जगभरातल्या उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने सेंच्युरियनमध्ये २०१८ मध्ये अविस्मरणीय खेळी केली होती. या खेळीची स्तुती आजही सगळे जण करतात. सेंच्युरियन कसोटीत आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३३५ धावा केल्या होत्या. भारताने २८ धावांवरच २ विकेट्स गमावल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने शतकीय खेळी करत २१वं शतक झळकावलं. त्याने १५३ धावांची खेळी केली होती.
कर्णधार असून शतक करणारा कोहली दुसरा कर्णधार बनला होता. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने कर्णधारपदी असताना केपटाऊनमध्ये शतक झळकावलं होतं. कोहली सचिन तेंडुलकरनंतर खेळाडू म्हणून २ किंवा त्यापेक्षा जास्ती शतक ठोकणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कोहलीने भारताच्या धावसंख्येपेक्षा निम्मा स्कोर स्वतः केला होता. ३०७ मधल्या १५३ धावा त्याच्याच होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“कपिल देव यांची गोलंदाजी ॲक्शन कॉपी करण्यासाठी ६ महिने करावा लागला ४ तास सराव”
आर्चरच्या दुखापतीबाबत आले मोठे अपडेट; आयपीएलसाठी असणार का उपलब्ध? वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा – आफ्रिदीने विश्वविक्रम केला, तोही सचिनच्या बॅटने