क्रिकेट जगतात एकमेकांना ट्रोल केलेले आपण पाहिले आहे. त्याचबरोबर काहीवेळा इतरांना ट्रोलिंग करताना तो डाव स्वत:वरच उलटलेलाही आपण पाहिले आहे.
अशाच प्रकारे पाकिस्तान सुपर लीगमधील (Pakistan Super League) इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) या संघाने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) ट्रोल (Troll) करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. तसेच त्यांना चाहत्यांच्या टीकेलाही (Critic) सामोरे जावे लागले आहे.
झाले असे की, इस्लामाबाद युनायटेड संघाने कोरोना व्हायरसच्या जागरूकतेसाठी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “मर्यादा ओलांडू नका, हे खूप महागात पडू शकते. आवश्यकता नसेल तर घरातून बाहेर पडू नका. वैयक्तिक अंतर ठेवा. परंतु लक्षात असू द्या की तुम्ही एकमेकांच्या जवळ आहात.”
❗️ Don't cross the line. It can be costly ❗️
Don't leave your homes unnecessarily, MAINTAIN PHYSICAL DISTANCE but make sure your hearts remain close. #UnitedAgainstCovid19 pic.twitter.com/LjmX1ZhXyz
— Islamabad United (@IsbUnited) April 2, 2020
या ट्विटबरोबरच इस्लामाबाद युनायटेड संघाने २०१७च्या चँपियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरुद्धच्या अंंतिम सामन्यातील बुमराहच्या नो- बॉलचा फोटो शेअर केला. त्यामुळे याला प्रत्युत्तर देत भारतीय चाहत्यांनी मोहम्मद आमीरचा फोटो शेअर केला आहे आणि त्यांना ट्रोल केले आहे. तसेच लिहिले की, हो समजले.
Ok got it… pic.twitter.com/NlCZNXWL1K
— Ahsan Awan (@Pharmacist_awan) April 3, 2020
इस्लामाबाद संघाच्या या ट्वीटला प्रत्युत्तर देत भारतीय चाहत्याने मोहम्मद आमीरच्या नो-बॉलचा फोटो शेअर केला आहे. तसेच यामध्ये लिहिले की, मर्यादेच्या आत रहा आणि सुरक्षित रहा. नाहीतर ५ वर्षांचा तुरुंगवास होईल.
https://twitter.com/MrCricketExper1/status/1245676377514205185
आमीरने २०१०मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यादरम्यान मुद्दाम नो-बॉल टाकला होता. तसेच मॅच फिक्सिंगमुळे त्याला तुरुंगात जावे लागले होते.
यापूर्वी पाकिस्तानच्या फैसलाबाद शहरात वाहतूक पोलिसांनी २०१७ च्या बुमराहचा हा फोटो शेअर करत त्याला ट्रोल केले होते. त्याने यावेळी लिहिले होते की, ही लाईन ओलांडू नका. कारण तुम्हाला माहिती आहे की हे किती महागात पडू शकते.
बुमराहने २०१७च्या चँपियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नो-बॉल टाकून पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर जमानला (Fakhar Jaman) जीवदान दिले होते. त्याने ११४ धावांची शतकी खेळी करत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय संघ या सामन्यात १८० धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत झाला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
-या ५ खेळाडूंना आहे कसोटीत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय
-ज्या संघाचं नाव घेतलं तरी गंभीरला यायचा राग, तेच करताय आता गंभीरचं कौतूक