बऱ्याचशा क्रिकेटपटूचं क्रिकेटवर इतकं प्रेम असतं की, ते निवृत्तीनंतर या क्षेत्राशी जोडलेले राहतात. अनेकदा याची उदाहरणे प्रत्यक्षात पाहायला मिळतात. असेच काहीसे दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (Second Test) बघायला मिळाले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (VIrat Kohli) या सामन्यातून बाहेर (Virat Kohli Ruled Out) आहे. परंतु मैदानाबाहेर असतानाही तो आपल्या संघ सहकाऱ्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो आहे.
मंगळवारी (०४ जानेवारी) या सामन्याचा दुसरा दिवस होता. या दिवसादरम्यान कोहली सीमारेषेबाहेरून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) याला काही सल्ले देताना (Kohli Giving Tips To Shami) दिसला आहे.
जेव्हा भारतीय संघाची गोलंदाजी सुरू होती. त्यावेळी अनुभवी गोलंदाज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. यादरम्यान कोहली त्याच्याजवळ जातो आणि त्याच्याशी काहीतरी बोलू लागतो. तसेच पुढे कोहली आणि शमीने केलेले हातवारे पाहून त्यांच्यामध्ये क्षेत्ररक्षणासंबंधी काहीतरी बोलणे झाले असल्याचे भासते आहे. दुखापतीनंतरही कोहलीला अशाप्रकारे आपल्या सहकाऱ्यांची मदत करताना पाहून क्रिकेट चाहते मात्र प्रभावित झाले आहेत. कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Clearly can’t keep this guy off a cricket field pic.twitter.com/vmBiCm9I2k
— Sonali (@samtanisonali1) January 4, 2022
हेही वाचा-“माझ्या मनात अनेक विचार येतायेत…” विराट संघाबाहेर झाल्याने दिग्गजाने व्यक्त केली चिंता
पाठीच्या दुखापतीमुळे विराट सामन्यातून बाहेर
दरम्यान या सामन्याची सुरुवात होण्यास अवघ्या काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना नाणेफेकीपूर्वी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यास अनुपस्थित राहणार असल्याचे वृत्त आले होते. त्याच्याजागी हनुमा विहारी (Hanuma Vihari) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा दिली गेली आहे. तर केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्त्व करतो आहे.
नाणेफेकीनंतर विराटच्या अनुपलब्धतेबद्दल प्रभारी कर्णधार राहुलने माहिती दिली होती. तो म्हणाला होता की, दुर्दैवाने विराटला पाठीच्या वरच्या बाजूला दुखापत झाली आहे. फिजिओ त्याच्यावर काम करत आहेत आणि आशा आहे की तो पुढच्या कसोटीपर्यंत बरा होईल. विराटच्या जागी हनुमा विहारी खेळणार आहे. हा फक्त एकच बदल आहे.
हेही वाचा- नाणेफेक होण्याच्या काही मिनिटांपूर्वी विराटने रहाणेला सांगितले नक्की कुठे होतोय त्रास
तसेच आपल्याला मिळालेल्या जबाबदारीबद्दल बोलताना राहुल म्हणाला होता की, आपल्या देशाचे नेतृत्व करणे हे प्रत्येक भारतीय खेळाडूचे स्वप्न असते. खरोखर ही सन्मानाची गोष्ट आहे आणि मी या आव्हानाची वाट पाहत आहे. आम्हाला येथे काही चांगले विजय मिळाले आहेत आणि आशा आहे की आम्ही ते पुढे असेच सुरू ठेवू. एकूणच सेंच्युरियनमध्ये आम्ही चांगले खेळलो. आम्ही एक संघ म्हणून खरोखरच चांगली कामगिरी केली. आता या सामन्याबद्दल आम्ही खरोखरच उत्सुक आहोत.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी २०२१: तमिळ थलायवाजपुढे यूपी योद्धांची शरणागती, ६ अंकांच्या फरकाने सामन्यात मारली बाजी
हैदराबादला रोखून अव्वल स्थान पटकावण्यास मोहन बागान उत्सुक
हेही पाहा-