अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी२० मालिकेतील चौथा सामना झाला. या सामन्यात भारताकडून अर्धशतक करणाऱ्या सुर्यकुमार यादवची विकेट आणि वॉशिंग्टन सुंदरची विकेट वादग्रस्त ठरली. त्यांच्या विकेटमुळे चर्चेला उधान आले आहे.
नक्की काय झाले?
झाले असे की या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून सुर्यकुमार १४ व्या षटकात ५७ धावांवर खेळत होता. हे षटक सॅम करन टाकत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सुर्यकुमारने फाईन लेगवरुन मोठा फटका मारला. पण तिथे असणाऱ्या डेव्हिड मलानने तो चेंडू चपळाईन झेलला.
मात्र त्याने चेंडू झेलल्यानंतर तो चेंडू जमीनीला टेकला की नाही हे तिसऱ्या पंचांकडून तपासण्यात आले. मात्र तिसऱ्या पंचांनी वेगवेगळ्या बाजूंनी चेंडू जमीनीला लागला की नाही हे पाहिल्यानंतरही संभ्रम कायम राहिला. त्यामुळे अखेर मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिंग्नल बाद दिलेला असल्याने सुर्यकुमारला विकेट गमवावी लागली.
Surya Kumar yadav was never out.
Idiots…#INDvsENG_2021 #T20I #suryakumaryadav pic.twitter.com/R2EDpbJTEL
— तुषार उप्रेती (@tusharupreti123) March 18, 2021
यानंतर शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत असताना चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने मोठा फटका खेळला. मात्र बाऊंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या आदिल राशिदने त्याचा झेल घेतला. मात्र याचवेळी त्याचा पाय बाऊंड्री लाईनच्या अगदी जवळ असल्याने त्याचा पाय बाऊंड्री लाईनला लागला की नाही हे तपासण्यात आले.
मात्र, तिसरे पंच विरेंद्र शर्मा यांनी खुप वेळ तपासल्यानंतरही त्याचा पाय बाऊंड्री लाईनला लागला की नाही याबद्दल कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याने आणि मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिग्नल बाद दिलेला असल्याने त्यालाही ४ धावांवर आपली विकेट गमवावी लागली.
https://twitter.com/HarishB24531146/status/1372581785519812608
पंचांच्या निर्णयावर चाहत्यांची टीका
तिसऱ्या पंचांनी सॉफ्ट सिंग्नल बाद असल्याने सुर्यकुमार आणि सुंदर या दोघांनाही बाद घोषित केल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी काही मजेदार मीम्सही याबाबत शेअर केले आहेत. तसेच अनेकांनी आयसीसीला नियमात बदल करण्यासही सुचवले आहे.
भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही एका लहान मुलाने डोळ्यावर पट्टी बांधलेला आणि मलानने सुर्यकुमारचा झेल घेतानाचा फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले आहे की ‘जेव्हा तिसरे पंत निर्णय देत असतात.’ या ट्विटवरुन सेहवागने तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयांवर टीका केली आहे.
Third umpire while making that decision. #INDvENGt20 #suryakumar pic.twitter.com/JJp2NldcI8
— Virender Sehwag (@virendersehwag) March 18, 2021
Third umpire has definitely taken weed or something.
2 conclusive evidence of @surya_14kumar & @Sundarwashi5 were given out just because umpire had to maintain neutrality.@ICC you need to revise your rules#INDvsENG_2021 #SuryakumarYadav #Adil rashid— Raj S Agrawal (@raj122_raj) March 18, 2021
#INDvsENG_2021 #INDvsEND#SuryakumarYadav #indvsengt20
Soft Signal n Third Umpire together.. pic.twitter.com/UjswXS8saI— Vaibhav (@vrushv14) March 18, 2021
https://twitter.com/Extrajeet/status/1372581319260073989
After this match#SuryakumarYadav #ENGvIND #virushka #RohitSharma #ICCT20I #BCCI pic.twitter.com/bcJEqeqESe
— Im_briston (@BristonIm) March 18, 2021
https://twitter.com/ankurparashar61/status/1372581476999426048
Exclusive close-up images of Dawid Malan's hand & Abdul Rashid's shoes, as seen by the TV Umpire's Television screen.#INDvENG #SuryakumarYadav
(Pics from: Pinterest, Pixabay) pic.twitter.com/xpBOZk34pB— Blessen Varghese (@blessenv) March 18, 2021
Fuck 3rd umpire😤#INDvsENG #SuryakumarYadav pic.twitter.com/AM9AwdcMd4
— murali🤸 (@muralir2o) March 18, 2021
https://twitter.com/BiberAbhishek/status/1372580810927173642
https://twitter.com/GolakiyaRidham/status/1372580774960975873
भारताचे इंग्लंडला १८६ धावांचे आव्हान
भारताने पहिल्या तीन विकेट्स लवकर गमावल्या. पण त्यानंतर सुर्यकुमारने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने १८ चेंडूत ३७ धावांची आक्रमक खेळी केली. त्याचबरोबर रिषभ पंतनेही २३ चेंडूत ३० धावांची छोटेखानी खेळी केली. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८५ धावा करता आल्या. त्यामुळे इंग्लंडसमोर हा सामना जिंकण्यासाठी १८६ धावांचे आव्हान भारताने ठेवले.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतात रोहितच ‘सिक्सर किंग’! पहिल्या चेंडू षटकार मारत ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय
हिटमॅनचा विक्रम! १२ धावांवर बाद होऊनही रोहितने टी२० क्रिकेटमध्ये गाठला ‘हा’ मोठा टप्पा
बाबर आझम पुन्हा अडकला वादाच्या भोवऱ्यात, दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला धक्का