अहमाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी२० सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी२० सामना २० मार्च रोजी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३६ धावांनी विजय मिळवत ३-२ फरकाने मालिका आपल्या नावावर केली. तसेच पाचव्या टी -२० सामन्यात भारतीय संघाकडून मोठा बदल पाहायला मिळाला होता.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे फलंदाज आले होते.विराट कोहलीने या सामन्यात सर्वाधिक नाबाद ८० धावांची खेळी केली. सामना झाल्यानंतर कोहलीने रोहित शर्माबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लिश संघाने नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाला मान देत भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वेगवान सुरुवात करून दिली. त्या दोघांनी ९४ धावांची सलामी भागीदारी केली.
या सामन्यानंतर भविष्यात रोहितबरोबर सलामीला पुन्हा उतारणार का याबद्दल विराट म्हणाला, “मला रोहितचा सहकारी बनायला आवडेल. जेव्हा आमच्या दोघांपैकी एक खेळाडू मैदानावर उपस्थित असतो. तेव्हा इतर खेळाडूंना आत्मविश्वास मिळतो. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरने देखील संघाला सांभाळून घेतले.”
आयपीएलमध्ये देखील कोहली सलामी फलंदाजी करणार
येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत आरसीबी संघांचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने म्हटले आहे की,” मी आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट, दोन्हीमध्ये ही सलामी फलंदाजी करेल. आमच्याकडे मजबूत मध्यक्रम आहे. यामुळे संघातील दोन मुख्य खेळाडूंना जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बेन स्टोक्सला ‘या’ क्रमांकावर खेळवणे निरउपयोगी, इंग्लंडच्या दिग्गजाने सुनावले
मिताली राजची भूमीका साकारत असलेल्या तापसी पन्नूचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘सेम टू सेम’
‘कोर्ट हे माझ्यासाठी मंदिर-मशिदीसारखे…’ शमीची पत्नी हसीन जहां यांच्या पोस्टने उडाली खळबळ