चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी रविवारी (१९ सप्टेंबर) आयपीएल २०२१मधील ३० व्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा युवा इशान किशनसोबत गप्पा मारताना दिसला. धोनीशी गप्पा मारण्यासाठी अनुकुल रॉय हा देखील किशनसोबत सामील झाला होता. या तिघांचेही झारखंड कनेक्शन आहे.
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर खात्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि त्यास कॅप्शन दिले “झारखंड कनेक्शन.” धोनी अनेकदा सामन्यानंतर तरुणांशी संवाद साधताना दिसतो. यावेळी तो इशान किशन आणि अनुकूल रॉय, तसेच अन्य खेळाडूंशी चर्चा करता दिसला. धोनी, इशान आणि अनुकूल या तिघांनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडचे प्रतिनिधित्व केले आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1439869439164485636
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात इशान प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. मात्र रॉयला या सामन्यासाठी निवडले गेले नाही. २२ वर्षीय रॉयने मुंबईसाठी फक्त एक सामना खेळला आहे आणि त्याने २०१९ मध्ये आयपीएलमध्ये आपले पदार्पण केले होते.
The Respect Remains Top 💯#CSKvsMI #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/GEqtlTpdAi
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 20, 2021
ईशान या सामन्यात त्याच्या फलंदाजीचा फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याला फक्त ११ धावा करता आल्या होत्या. मुंबईचा संघ या हंगामातील पाचवा विजय मिळवण्यासाठी १५७ धावांचा पाठलाग करत होता, पण त्यांना २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात फक्त १३६ धावा करता आल्या.
तत्पुर्वी, एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२१ च्या यूएई लेगचा पहिला सामना जिंकला. सीएसकेने मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला. चेन्नईच्या या विजयात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ८८ धावांची दमदार खेळी करत चेन्नईला १५६ धावांपर्यंत पोहचवले. या खेळीत त्याने चार षटकार आणि ९ चौकार लगावले.
मुंबईकडुन सौरभ तिवारी वगळता इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. सौरभने एकाकी अर्धशतक झळकावले. पण तो संघास विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून विराटने आरसीबीचे कर्णधारपद सोडले; खास मित्र स्टेनने सांगितले खरे कारण
आयपीएलमध्ये लखनऊ संघाची जागा पक्की? लवकरच एकाना स्टेडियमवर होणार आंतरराष्ट्रीय सामने