मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शुक्रवारपासून दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पंजाब क्रिकट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी (100th Test) आहे. या सामन्यात चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, चांगली सुरुवात मिळाल्यानंतर तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. श्रीलंकेचा युवा फिरकीपटू लसिथ एम्बुलडेनिया (Lasith Embuldeniya) याने त्याला त्रिफळाचीत केले. त्याच लसिथ एम्बुलडेनियाबाबत आपण जाणून घेऊया.
लसिथचा ड्रीम बॉल
आपल्या शंभराव्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराटने शानदार सुरुवात केली. हनुमा विहारीसह त्याने अर्धशतकी भागीदारी केली. आपल्या अर्धशतकाकडे आगेकूच करत असताना श्रीलंकेचा युवा फिरकीपटू लसिथ एम्बुलडेनियाने ४५ धावांवर त्याला त्रिफळाचीत केले. लसिथ एम्बुलडेनियासाठी विराटला त्याच्या १०० व्या सामन्यात बाद करणे म्हणजे स्वप्न साकार करण्यासारखे आहे.
— cricket 456789 (@456789Cricket) March 4, 2022
लसिथ एम्बुलडेनियाला श्रीलंकन क्रिकेटचे भविष्य मानले जाते. त्याचा जन्म श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झाला. वयाच्या २० व्या वर्षी त्याने आपले प्रथमश्रेणी पदार्पण केले होते. त्याने अवघ्या ४१ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये २०५ बळी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोन वर्षातच म्हणजे २०१९ मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली.
मोहाली कसोटीच्या आधी खेळलेल्या १३ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ६२ बळी मिळवले होते. त्याने आत्तापर्यंत पाच वेळा एका डावात पाच तर, एकावेळी सामन्यात दहा बळी घेण्याची कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली असली तरी, त्याला अद्याप मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. मोहाली कसोटीच्या पहिल्या दिवशीही त्याने तीन बळी मिळवत श्रीलंकेच्या गोलंदाजीचे नेतृत्व केले.
महत्वाच्या बातम्या-