अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. 1 लाख 30 हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांपुढे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने जबरदस्त विक्रम करण्याचा बहुमान मिळवला. रोहित अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव फलंदाज बनला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ख्रिस गेल याचाही विक्रम मोडीत काढला आहे. चला तर, रोहितच्या विक्रमाविषयी जाणून घेऊयात…
रोहितचा विक्रम
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाकडून रोहित शर्मा डावाची सुरुवात करण्यासाठी सलामीला उतरला होता. रोहितने यावेळी डावातील पाचवे षटक टाकत असलेल्या मिचेल स्टार्क याच्या सहाव्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. हा षटकार मारताच रोहितच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर नोंदवला गेला. यानंतर रोहितने आणखी एक षटकार मारला. ग्लेन मॅक्सवेल टाकत असलेल्या 10व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रोहितने षटकार मारला. यामुळे षटकारांच्या संख्येत आणखी भर पडली.
Rohit Sharma smashed 86th Six vs Australia which is most against a Team by any player in ODI history pic.twitter.com/PEPzK0z5kH
— Broken Cricket (@BrokenCricket) November 19, 2023
रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 87 षटकार पूर्ण केले आहेत. रोहितपूर्वी वनडेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर होता. त्याने इंग्लंड संघाविरुद्ध वनडेत 85 षटकार मारले होते. मात्र, आता गेलला मागे टाकत रोहित पुढे गेला.
अर्धशतकाला मुकला रोहित
या सामन्यात रोहित शर्माने शानदार सुरुवात केली होती. मात्र, त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो 31 चेंडूत 47 धावांवर बाद झाला. या खेळीत 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, रोहित न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही रोहित 29 चेंडूत 47 धावा करून बाद झाला होता. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. (world cup 2023 final Rohit Sharma against has most six by a batter against a team in ODIs)
हेही वाचा-
WC Finalचा निकाल लागण्यापूर्वीच युवराजने निवडला आपला Player of the Tournament, रोहित-विराटला दिला धक्का
भारतीयांची बातच न्यारी! वर्ल्डकप फायनलनंतर विश्रांतीसाठी शाळेने रद्द केली परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी काढले थेट नोटिसपत्र