आयपीएलधील राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा भाग असलेला खेळाडू यश दयालची (Yash Dayal) बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तत्पूर्वी यश दयालने (Yash Dayal) आयपीएलमधील एक संस्मरणीय किस्सा सांगितला आहे.
वास्तविक, 18 मे 2024 रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यामध्ये सामना झाला होता. हा सामना महत्वाचा होता. कारण विजयाची नोंद करून RCBने CSKला प्लेऑफमध्ये जाण्यापासून रोखले होते. त्या सामन्याचे शेवटचे षटक टाकण्यासाठी दयाल आला होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर एमएस धोनीने 110 मीटर लांब षटकार ठोकला होता. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) दयालकडे गेला आणि त्याच्या सल्ल्याने पुढच्याच चेंडूवर धोनी बाद झाला.
यश दयाल (Yash Dayal) म्हणाला की, “विराट भाईने मला सांगितले की, एमएस धोनीला वेगवान चेंडू आवडतात म्हणून त्याला वेग देऊ नये. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर विराट भाईने मला शांत केले आणि त्याच्याशी बोलून मला खूप बरे वाटले आणि त्यानंतर धोनी भाई बाद झाला.”
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 मधून निवृत्त होणार हा दिग्गज? प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य
IPL 2025: केएल राहुलची होणार सुट्टी? लखनऊला मिळणार नवा कर्णधार?
बांगलादेशच्या ‘या’ खेळाडूपासून भारताला राहावे लागणार सावध! भारताविरूद्ध धमाकेदार आकडेवारी