सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली आहे. अशामध्ये भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगदेखील यादरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. तो सध्या आपल्या संघसहकाऱ्यांशी इंस्टाग्रामवर लाईव्ह चॅट करताना दिसतो. अशाच एका लाईव्ह सेशनमध्ये युवराजने भारतीय संघाचा सध्याचा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
युवराजच्या मते, टी२० क्रिकेटमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची क्षमता विक्रमकडे नाही. त्याने केवळ विक्रमवरच (Vikram Rathour) नव्हे तर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि संघ निवडकर्त्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
युवराज म्हणाला की, प्रत्येक खेळाडूंंना वेगवेगळ्या पद्धतीने वागणूक द्यावी लागते. तो पुढे म्हणाला की, “मी प्रशिक्षक असतो, तर सर्वांना वेगळ्या पद्धतीने वागणूक दिली असती. मी रात्री ९ वाजता जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) शुभ रात्री म्हणालो असतो आणि रात्री १० वाजता हार्दिक पंड्याबरोबर (Hardik Pandya) ड्रिंक्स पार्टीला गेलो असतो.”
“सध्याच्या भारतीय संघाकडे सल्ला देण्यासाठी कोणीही नाही. मला नाही माहित नाही की शास्त्री हे करत आहेत की नाही,” असेही युवराज पुढे म्हणाला.
“मी नेहमी म्हणतो की, निवडकर्त्यांचे निर्णय आव्हान देणारे असले पाहिजेत. परंतु जर तुमच्या निवडकर्त्यांनी केवळ ४-५ वनडे सामन्यात खेळले असतील तर त्यांची मानसिकताही त्याच पद्धतीची असेल. अशाप्रकारच्या गोष्टी सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि एमएस धोनी (MS Dhoni) जेव्हा कर्णधार होते, तेव्हा होत नव्हत्या. २०११च्या विश्वचषकात अनुभवी भारतीय संघ होता,” असे युवराज निवडकर्त्यांबद्दल बोलताना म्हणाला.
विक्रमने भारतीय संघाकडून १९९६-९७ दरम्यान केवळ ६ कसोटी आणि ७ वनडे सामने खेळले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जगातील हे दोन स्फोटक ओपनर २०२३चा विश्वचषक शंभर टक्के खेळणार
-हिंदू धर्मीयांच्या मदतीला शाहिद आफ्रिदी मंदिरात, मिळाले आशिर्वाद
-हसीन जहाॅं प्रकरण भोवणार, शमीला मिळणार नाही अर्जुन पुरस्कार?