भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीत अनेक संघांचा भाग होता. त्याने २००८मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. पण, स्वत: युवराजने त्याला किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळायचे नव्हते, असा मोठा खुलासा केला आहे. तर, दुसऱ्या बाजूला त्याने म्हटले आहे की, त्याला पुणे वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळून खूप चांगले वाटले.
नुकत्याच झालेल्या इंस्टाग्राम लाइव्ह चॅटवर युवराजने याबाबतीत उलगडा केला आहे. यावेळी युवराज म्हणाला की, “मला किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळायचे होते. पण संघ व्यवस्थापकांना मी आवडत नव्हतो. मी त्यांना जे काही करायला सांगितले, त्यांनी ते कधीच केले नाही.” Yuvraj Singh statement on his worst and best ipl team.
“मी जेव्हा त्या संघातून बाहेर पडलो. तेव्हा त्यांनी त्या सर्व खेळाडूंना विकत घेतले, ज्यांना मी संघात असताना घ्यायची शिफारस केली होती. मला पंजाब संघ आवडतो. पण, ज्याप्रमाणे फ्रंचायझी काम करत ते मला आवडत नाही.”
पुढे बोलताना युवराज म्हणाला की, “जरी मला पुणे वॉरियर्स इंडियाकडून जास्त सामने खेळायला मिळाले नसले तरी त्यांच्याकडून खेळताना मला खूप चांगले वाटले. आमच्या संघाचे मालक खूप चांगले होते. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासोबतचा माझा पूर्ण हंगाम दमदार होता. मी त्यावेळी खूप मजा केली. मला पुढेही त्यांच्याकडून खेळायचे होते. पण, लिलावात मला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले होते.”
युवराजला आयपीएलमधील कोणत्याही संघाकडून ३-४ हंगामापेक्षा जास्त काळ खेळता आले नाही. एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना एकाच संघाकडून कित्येक हंगाम खेळायला मिळाले. यामुळे आपल्याला परिस्थितींचा अंदाज येतो आणि त्यानुसार सराव करायचे समजते. त्याच्या मते प्रत्येक हंगामात त्याचा लिलाव होत होता आणि तो एका संघात टिकून राहत नव्हता.
युवराजने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत किंग्स एलेव्हन पंजाब, पुणे वॉरियर्स इंडिया, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, सनराइजर्स हैद्राबाद आणि मुंबई इंडियन्स या संघांकडून खेळला आहे. त्याने गतवर्षी आयपीएलमधील शेवटचा सामना खेळला होता.
ट्रेंडिंग घडोमोडी-
क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवलेल्या खेळाडूंची ड्रीम ११
२००१ ते २०१० या काळात सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू, सचिन आहे चक्क…
तुम्हाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आम्हाला विराट बोलायचा