भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज यूजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. तसेच ते एकमेकांसोबतचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे मालदीव मधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अशातच, यूजवेंद्र चहलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.
चहल आणि धनश्री हे दोघेही डिसेंबर महिन्यात विवाह बंधनात अडकले होते. या दोघांनीही आता आपल्या विवाह सोहळ्याचा एक व्हि़डिओ प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हिडिओचा टीजर चहलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यावर चाहते आपले प्रेम व्यक्त करत आहेत. या टीजरमध्ये चहल आणि धनश्री यांच्या मेहंदी सोहळ्यापासून ते विवाह सोहळ्यातील फोटोज् आहेत.
२७ मार्च रोजी होणार प्रदर्शित
हा व्हिडिओ २७ मार्च २०२१ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. याबाबतची माहिती चहलने टिजर शेअर करत असताना दिली आहे. त्याने आपल्या टीजरच्या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले आहे की, “तू माझी आहेस, मी तुझा आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. चित्रपट २७ मार्च रोजी प्रदर्शित होईल,” असे त्याने लिहिले होते. धनश्रीने देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CMrLD1on3CT/
डिसेंबर महिन्यात अडकले होते विवाह बंधनात
चहल आणि धनश्री हे २२ डिसेंबर २०२० मध्ये विवाह बंधनात अडकले होते. विवाहाबाबत त्यांनी कुठलीही अधिकृत माहिती दिली नव्हती. विवाह झाल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत माहिती दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
चक्क ११४ मीटरचा षटकार! एमएस धोनीने ठोकलेले ‘हे’ गगनचुंबी षटकार पाहून व्हाल अवाक्
भविष्यात टीम इंडियासाठी रोहितसह सलामीला उतरणार का? विराटने दिले ‘हे’ उत्तर
बेन स्टोक्सला ‘या’ क्रमांकावर खेळवणे निरउपयोगी, इंग्लंडच्या दिग्गजाने सुनावले