बहुप्रतिक्षित आयपीएल २०२१ चा लिलाव गुरुवारी चेन्नई येथे पार पडला. अपेक्षेप्रमाणेच कोट्यावधींची बोली लावत नामांकित खेळाडूंना विविध संघांनी आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलचाही समावेश होता. मॅक्सवेलवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने तब्बल १४ कोटी २५ लाख कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले.
विराट कोहली, एबी डिविलियर्स यासारखी दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या संघात आता मॅक्सवेलही दाखल झाल्याने बंगलोरचा संघ मजबूत झाला आहे. त्यामुळे संघातील इतर खेळाडूही खुश झाले असून त्यांनी मॅक्सवेलचे संघात स्वागत केले आहे. यातच युजवेंद्र चहलचाही समावेश असून चहलने आपल्या हटके अंदाजात मॅक्सवेलसाठी ट्विट केले आहे.
“टॉम आणि जेरी आले एकत्र”
लेगस्पिनर युझवेंद्र चहल नेहमीच आपल्या विनोदी स्वभावासाठी ओळखला जातो. मॅक्सवेलचा बंगलोरच्या संघात समावेश झाल्यावर देखील त्याने आपल्या याच विनोदी शैलीत एक ट्विट केले आहे. मॅक्सवेलच्या समावेशाने झालेल्या आनंद व्यक्त करतानाच तो म्हणाला, “टॉम आणि जेरी आता एकाच संघात आले आहेत. मॅक्सवेल, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या परिवारात तुझे स्वागत आहे.”
When Tom and Jerry are finally in the same team 👀👻 @RCBTweets welcome to the family brother 🤜🤛 @Gmaxi_32 let’s #playbold #IPL2021Auction pic.twitter.com/OcPMQL6FBH
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) February 18, 2021
बंगलोरच्या संघाकडून खेळण्याची दर्शविली होती इच्छा
विशेष म्हणजे, आयपीएलच्या लिलावापूर्वीच ग्लेन मॅक्सवेलने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने आपला आवडता खेळाडू असलेल्या एबी डिविलियर्ससह खेळण्याची इच्छा असल्याचे विधान केले होते. बंगलोरच्या संघाने जणूकाही त्याच्या इच्छेला मान दिल्याचे लिलावात दिसून आले.
मात्र आता मॅक्सवेल बंगलोरकडून तरी आपल्या लौकिकाला साजेसे प्रदर्शन करणार का, हे पाहावे लागेल. कारण गत हंगामात पूर्णपणे अपयशी ठरला होता. किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळताना त्याने १३ सामन्यात फक्त १०८ धावा केल्या होत्या. विशेष, म्हणजे यात तो एकही षटकार मारू शकला नव्हता. पंजाबने त्यावर तब्बल १०.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यामुळे यंदा हा यात तो बदल करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.
महत्वाच्या बातम्या:
ऑस्ट्रेलियन ओपन: नाओमी ओसाकाने मिळवले चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद; फायनलमध्ये ब्रेडीचा पराभव
विजय हजारे ट्रॉफी : मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाचे तुफानी शतक, झारखंडचा मध्य प्रदेशवर दणदणीत विजय