आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 39 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात केकेआरचा दारुण पराभव झाला. केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनने आरसीबीच्या डावाच्या पहिल्या षटकात घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर चांगलाच भडकला.
पॅट कमिन्सला दिले पहिला षटक
जेव्हा बेंगलोरचा डाव सुरू झाला तेव्हा कर्णधार मॉर्गन वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला पहिल्या षटकात गोलंदाजी देईल असे प्रत्येकालाच वाटत होते. कारण सामन्यात टिकून राहण्यासाठी बेंगलोरच्या फलंदाजांना बाद करणे आवश्यक होते. परंतु वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने केकेआरकडून पहिले षटक फेकले. कमिन्सने या हंगामात फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे, पण त्याला गोलंदाजीत काही खास कामगिरी करता आलेली नाही.
चांगलाच भडकला गंभीर
या सामन्यात गौतम गंभीर समालोचन करत होता. मॉर्गनने घेतलेला निर्णय गौतम गंभीरला समजू शकला नाही. समालोचन करताना तो म्हणाला की, “कर्णधार मॉर्गन काय विचार करतो हे मला माहित नाही. त्याने लॉकी फर्ग्युसनला पहिले षटक का दिले नाही हे मला कळलं नाही.”
लॉकी फर्ग्युसनने हैदराबादविरुद्ध पाच बळी घेतले होते. त्याने केलेल्या दमदार गोलंदाजीमुळेच केकेआरला विजय मिळवता आला होता.
लॉकी फर्ग्युसनने फेकले सातवे षटक
दिनेश कार्तिकने कर्णधारद सोडल्यानंतर केकेआरमध्ये काही बदल होऊ शकतात असे वाटत होते. मॉर्गन निःसंशयपणे इंग्लंड संघाचा यशस्वी कर्णधार आहे, परंतु या पराभवानंतर त्याच्यावर नक्कीच प्रश्नांचा भडीमार होईल. लॉकी फर्ग्युसन सारखा यशस्वी गोलंदाज असूनही पहिले षटक वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला देण्यात आले, त्यानंतर दुसरे षटक मध्यमगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने फेकले आणि तिसरा षटक परत कमिन्सने फेकले. यानंतर सातवे षटक फर्ग्युसनला देण्यात आला. या षटकात आरसीबीचे दोन गडी बाद झाले. फर्ग्युसनने सलामीवीर फिंचला बाद केले आणि त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये युवा फलंदाज पडिककल धावबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
-कोलकाताच्या फलंदाजांना लोळवणाऱ्या सिराजला विराटने सामन्याआधी दिला होता ‘हा’ खास संदेश
केवळ एक-दोन नाही तर चक्क चार षटकं निर्धाव टाकत बेंगलोरने केला अनोखा पराक्रम
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज