मुंबई। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या फलंदाजीसोबत फिटनेसमुळेही चर्चेत असतो. अलीकडेच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या संघाच्या फिटनेसबाबत एक मोठे विधान केले. ते म्हटले होते की, पाकिस्तान फिटनेसच्या बाबतीत कोहलीची कॉपी करणार नाही. पाकिस्तानचे खेळाडू कुणापेक्षा कमी नाहीत आणि ते स्वत: चे निकष ठरवतील.
वकार युनूस म्हणाले की, “इथे बरेच क्रिकेटर तंदुरुस्त आहेत. यात शंका नाही. क्रिकेटचे तीन प्रकार आहेत आणि जेव्हा तुम्ही तिन्ही प्रकार खेळता तेव्हा फिटनेस राखली पाहिजे. तो (विराट) आपल्या देशातील सर्वोच्च खेळाडूंपैकी एक आहे. पण आमचे खेळाडूही यात मागे नाहीत. बाबर आझम खूप तंदुरुस्त आहेत. तो चांगली कामगिरी करत आहे. शाहिन शाह आफ्रिदीही सुपर फिट आहे.”
या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने सांगितले की, “कोणालाही कॉपी करुन आम्ही स्वतःचे निकष ठरवणार नाही. आम्ही पाकिस्तान क्रिकेटला जे अनुकूल असेल अश्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करू आणि संघाला पुढे नेऊ.”
पाकिस्तानला इंग्लंडसह ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कसोटी आणि टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे, ज्यासाठी ते इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सौरव गांगुली व्हावा आयसीसीचा अध्यक्ष, श्रीलंकेच्या या दिग्गज क्रिकेटपटूने दिला पाठिंबा
आता हिंदीमध्येही वाचायला मिळणार क्रिकेटचे नियम; भारताच्या या पंचाने केले नियमांचे भाषांतर
आयपीएलमधील ‘हा’ संघ घेऊन येत आहे डॉक्यूमेंटरी सिरिज; नाव आहे…
ट्रेंडिंग लेख-
यूएईमध्ये आयपीएल सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारे फलंदाज; एका भारतीयाचा समावेश
२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी
काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा