मॅनचेस्टर। पाकिस्तानचा युवा फलंदाज बाबर आझमची गणना जगातील युवा प्रतिभावान फलंदाजांमध्ये होते. परंतु अनेक क्रिकेट तज्ज्ञ त्याची गणना जगातील फॅब फोरमध्ये करणे घाईचे असल्याचे सांगतात. तरीही इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांचे असे मत आहे की, बाबर त्या श्रेणीतील फलंदाज आहे यामध्ये काहीही शंका नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की, आता फॅब ५ मध्ये बाबरला नक्कीच सामील झाले पाहिजे.
मॅनचेस्टर येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच बाबरने दिवशी १०६ चेंडूत ६९ धावा केल्या. याबरोबरच त्याने ११ चौकारही ठोकले.
हुसने यांनी म्हटले की, बाबरला ते नाव आणि प्रसिद्धी मिळणार नाही. कारण तो भारतीय कर्णधार विराट कोहली नाही. ते पुढे म्हणाले, “जगामध्ये फॅब फोर- विराट कोहली, केन विलियम्सन, जो रूट आणि स्टिव्ह स्मिथ यांच्याबद्दल चर्चा केली जाते. परंतु आता वेळ आली आहे की फॅब ५ बद्दल चर्चा झाली पाहिजे. त्याचबरोबर बाबरलाही यामध्ये सामील केले पाहिजे.”
“जर बाबर विराट कोहली असता, तर प्रत्येक जण त्याच्याबद्दल चर्चा करत असता. परंतु हा बाबर आझम आहे, कोणीही याच्या बाबतीत चर्चा करत नाही. तो युवा आहे, हुशार आहे आणि त्याचा आपला स्वॅग आहे,” असेही हुसेन पुढे म्हणाले.
पाकिस्तानचा कसोटी कर्णधार अझर अलीनेही मालिका सुरु होण्यापूर्वी असेच वक्यव्य केले होते. तो म्हणाला होता की, बाबर विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या श्रेणीतील फलंदाज आहे. अझर पुढे म्हणाला होता की, बाबरने कसोटी फलंदाज बनण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता
-५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
-क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज
-या ५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत